Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रुग्णवाहिका न आल्यास कारवाई करा : पालकमंत्र्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर : कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रुग्णवाहिका बोलून न आल्यास रुग्णवाहिका चालक तसेच संबंधितांवर कारवाई करा, असे गुरुवारी (दि.९) झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या काळात कोणत्याही आजाराच्या रुग्णांसाठी अथवा अपघात काळातील अपघातग्रस्तांना मदतीसाठी रुग्णवाहिका बोलविल्यास नकार दिला जातो. तर येण्यास रुग्णवाहिका चालक व अन्य संबंधित नकार देत, यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी थेट पालकमंत्री यांच्याकडे नागरिकांनी केल्या. या तक्रारीची पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी दखल घेतली.
रुग्णवाहिका बोलून न आल्यास अथवा कोरोनाचे कारण सांगून रुग्ण आणण्यास रुग्णवाहिका चालक तसेच अन्य संबंधितांनी नकार दिल्यास अथवा टाळाटाळ केली. याबाबत तक्रारी आल्यावर त्या संबंधित रुग्णवाहिका संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. यात खासगी रुग्णवाहिकावरही कारवाई केली जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments