Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने सत्कार बँकेचे निर्णय शेतकर्‍यांपर्यंत घेऊन जाणार - चेअरमन सिताराम गायकर

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.८ : कोरोना संसर्ग विषाणूमुळे देश हा नागरिकांच्या आरोग्याबरोबर आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. यामधून बाहेर येण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने शेतकर्‍यांसाठी विविध ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळून आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. जिल्हा बँकेने घेतलेल्या निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्ग सुखावणार आहे. सर्वसंचालक मंडळाच्या एकमताने हे सर्व निर्णय घेतले आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकर्‍यांसाठी विविध निर्णय घेतल्याबद्दल नगर बाजार समिती खरेदी-विक्री संघ, दूध संघ व पंचायत समिती सदस्यांच्यावतीने चेअरमन सिताराम गायकर, व्हा. चेअरमन रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले व संचालक मंडळांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, बन्सी कराळे, रेवन चोभे, संतोष कुलट, बबन आव्हाड, शिवाजी कार्ले, बहिरु कोतकर, बाबासाहेब खर्से, अंबादास बेरड, प्रा. संभाजी पवार, किसन बेरड, बाळासाहेब निमसे, राहुल पानसरे, दीपक कार्ले आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, बँकेने शेतकर्‍यांसाठी विविध निर्णय घेतल्यामुळे शेतकर्‍यांना थेट लाभ मिळणार आहे. सर्व सभासदांना 3 लाखापर्यंतच्या कर्जावर 2 टक्के व्याज माफ करण्यात येणार आहे. 8 अ 7/12 संयुक्त उतारे असणार्‍या शेतकर्‍यांना वैयक्तिक हमीवर पीककर्ज वितरित करण्यात येणार आहे. वर्ग 2 चे जमिनीवर शेतकरी सभासदांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करुन देणार आहे. महाराष्ट्र शासन कर्जमाफी योजनेत पात्र झालेल्या कर्जदार सभासदांना तथापि अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून कर्जाची रक्कम न आलेल्या सभासदांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था यांनी वितरित केलेल्या मध्यम मुदत कर्जदार सभासदांना जिल्हा बँकेमार्फत पीककर्ज वितरित करण्यात येणार आहे. मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज थकित असणार्‍या कर्जदाराला पीककर्ज वितरित करण्यात येणार आहे. दि. 31-1-2020 अखेर वसुलीस पात्र असणार्‍या मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जाच्या हप्त्यास दि. 31-8-2020 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसेच सभासदांना भांडवली स्वरुपाचे 10 गायीपर्यंत प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या कर्जाची एक वर्षासाठी उपलब्धता दिली करुन दिली आहे. तसेच या कर्जाच्या बाबतीत व्याजदरातही
यावेळी बोलताना अभिलाष घिगे म्हणाले की, नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे. पावसाच्या पाण्यावरती शेती अवलंबून आहे. तालुक्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नगर तालुक्यातील शेतकर्‍यांना घेतलेल्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.याबद्दल तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने बँकेच्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, बाजीराव खेमनर, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. चंद्रशेखर घुले, रावसाहेब पाटील शेळके, दत्ता पानसरे, अंबादास पिसाळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.


नगर ः अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकर्‍यांसाठी विविध निर्णय घेतल्याबद्दल नगर बाजार समिती खरेदी-विक्री संघ, दूध संघ व पंचायत समिती सदस्यांच्यावतीने चेअरमन सिताराम गायकर, व्हा. चेअरमन रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले व संचालक मंडळांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, बन्सी कराळे, रेवन चोभे, संतोष कुलट, बबन आव्हाड, शिवाजी कार्ले, बहिरु कोतकर, बाबासाहेब खर्से, अंबादास बेरड, प्रा. संभाजी पवार, किसन बेरड, बाळासाहेब निमसे, राहुल पानसरे, दीपक कार्ले आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments