Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी कट्टा विक्रीसाठी जवळ बाळगणारा अटक ; नगर एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीरामपूर दि.५- तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी कट्टा विक्रीच्या हेतूने जवळ बाळगणारा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोविंद रामनाथ पुणे (वय ३२, रा.म्हस्कीरोड, गलांडेवस्ती, वैजापूर, जि.औरंगाबाद) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील बसस्थानकाजवळ एक इसम देशी बनावटीचा गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे, अशी खात्रीपूर्वक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती. या माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकळीभान बसस्थानकाजवळ ओडिशाला सापळा रचून थांबले. काही वेळेनंतर तेथे एकजण संशयास्पद फिरताना आढळून आला. त्यास जागीच पकडून पथकातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, त्याने गोविंद रामनाथ पुणे (वय ३२, रा.म्हस्कीरोड, गलांडेवस्ती, वैजापूर, जि.औरंगाबाद) असे नाव सांगितले. यानंतर पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३० हजार रु.किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा व ५ हजार रु. किंमतीचा मोबाइल असा एकूण ३५ हजार रु.चा मुद्देमाल मिळून आला. तो सर्व जप्त करण्यात आला. यानंतर गावठी कट्टा कोठून आणला. परवान्याबाबत विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे त्याने दिले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोकाँ शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादी वरुन जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपी पुणे याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, रवी सोनटक्के, सचिन अडबल, ज्ञानेश्वर शिंदे, पोकाँ रणजित जाधव, संदीप चव्हाण, सागर ससाणे, चापोहेकाँ संभाजी कोतकर, सचिन कोळेकर आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments