Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राजूर येथील हत्येचे गूढ उकलले, आजोबा-मामा अटक ; नगर स्थानिक गुन्हे शाखा व राजूर पोलीसांची संयुक्त कारवाई

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर,दि.४- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाणे हद्दीतील चिचोंडी शिवारातील कृष्णावंतीनदीमध्ये मिळून आलेल्या अनोळख्या इसमाचे हत्येचे गूढ उकले.  दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करुन त्रास देणाऱ्या नातावाचा आजोबानेच खून केला तर मयत नातावाचे प्रेत नेण्यास मामाने मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व राजूर पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. आजोबा कमलाकर हनुमंत डगळे व मामा हरिचंद्र कमलाकर डगळे या दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दि. २ जुलै रोजी चिचोंडी शिवारातील कृष्णावती नदीवर असलेल्या पुलाखाली एका अनोळखी इसमाचे शरिराचे नऊ तुकडे करुन ते वेगवेगळ्या दोन पोत्यामध्ये भरुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने फेकून देण्यात आले होते. सदर घटनेबाबत चिचोंडी गावचे पोलीस पाटील अंकुश रामचंद्र मदे ( वय ४१, रा. चिचोंडी, ता अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलीस ठाण्यात गुरनं. १२०९/२०२०, भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन गुन्हा घडलेल्या घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची माहीती घेऊन गुन्ह्याच्या तपासकामी वेगवेगळी पथके नेमण्यात आली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व राजूर पो.स्टे यांनी सदर गुन्हयाचा तपास सुरु केला. गुन्ह्यातील अनोळखी मयत इसम याची ओळख पटविण्यासाठी मयताचे फोटो सोशल मिडीयावर पाठविण्यात आला. त्यावरुन खिरविरे (ता. अकोले) येथील एक तरुण प्रदीप सुरेश भांगरे (वय २५) हा दि.२७ जुन रोजीपासून बेपत्ता असल्याबाबत माहीती मिळाली होती. मयताचे गळ्यामध्ये व उजवे हाताचे मनगटामध्ये असलेल्या दोऱ्यावरुन मयताचे नातेवाईक भाऊ संचित सुरेश भांगरे यांनी घटनास्थळी येऊन प्रेताची पाहणी केली. प्रेत हे त्याचा भाऊ प्रदीप सुरेश भांगरे (वय २५) याचे असल्याचा त्याने संशय व्यक्त केला.
तपासा दरम्यान मयत हा वापरत असलेली हीरो होंडा (एमएच १५ सीसी ९९३३) ही दुचाकी बाभूळवंडी शिवारातील रस्त्याच्याकडेला झुडपामध्ये मिळून आली. त्यानंतर मयत याचे झालेल्या हत्येबाबत पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी साध्या वेशामध्ये गुन्हा घडले परिसरामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरुन गोपनिय माहीती घेतली. मयत व त्याचे आजोबा कमलाकर हनुमंत डगळे (रा. खिरविरे, ता- अकोले) यांच्यात नेहमी वाद होत होते. अशी माहीती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यादृष्टीने तपास करुन मयताचे आजोबा कमलाकर हनुमंत डगळे (वय ७० रा. खिरविरे, ता.अकोले) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली. त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता, त्यांंनी गुन्हा केला असल्याची कबुली देऊन प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मुलगा हरिचंद्र याची मदत घेऊन प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले. त्यावरुन आरोपी हरिचंद्र कमलाकर डगळे (वय३५, रा. खिरविरे, ता.अकोले, ह. रा. यवत ता- दौड जि. पुणे) यास यवत येथून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व पो नि उत्तम तांगडे, क्राईम युनिट, पिंपरी चिंचवड, पुणे यांचे संयुक्त टीमने ताब्यात घेतले.
आरोपीकडे गुन्हाबाबत कसून चौकशी केली असता आरोपी कमलाकर हनुमंत डगळे याने सांगितले, मयत प्रदीप सुरेश भांगरे (वय२५) हा नातू आहे. तो नेहमी दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करुन त्रास देत असे, त्यावरुन आमचे वाद झाले होते. दि. २७ जून रोजी संध्याकाळी नातू प्रदीप सुरेश भांगरे हा त्याची मोटार सायकल घेऊन दारु पिण्यासाठी पैशांची मागणीसाठी आला होता. त्यावरून वाद झाल्याने कोयत्याने वार करुन त्याची हत्या केली असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रेताचे नऊ वेगवेगळे तुकडे करुन ते दोन गोण्यामध्ये भरुन जवळच असलेल्या शेततळ्यामध्ये टाकले. मयत याची मोटारसायकल बाभूळवंडी शिवारातील रस्त्याचे कडेला झूडूपामध्ये टाकली. त्यानंतर दि. ३० जून रोजी मुलगा हरिचंद्र कमलाकर डगळे याला यवत येथून बोलावून घेतले. यानंतर दोघांनी शेतताळ्यातील प्रेताच्या गोण्या बाहेर काढून मोटारसायकलवरुन नेवून चिचोंडी शिवारातील कृष्णावती नदीवर असलेल्या पुलाखाली फेकून दिल्या असल्याचे सांगितले.
या गुन्ह्यांमध्ये कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नसताना पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्ह्याचा कुशलतेने तपास करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. या पुढील तपास राजुर पोलीस करीत आहेत. या तपासकामी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि दिलीप पवार, सपोनि.नितीन पाटील, पोसई गणेश इंगळे, पोसई नितीन खैरनार, राजूर पो.स्टे. स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ नानेकर, पोना संदीप पवार, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, भागीनाथ पंचमूख, योगेश सातपूले, राहूल सोळूके, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, रविंद्र घुंगासे, चा.पोना भरत बुधवंत, चा.पोकॉ घाडगे, सफौ प्रकाश निमसे, पोना किशोर तळपे, पोकॉ अशोक गाडे, दिलीप डगळे, चापोकॉ. राकेश मुलानी यांच्या संयुक्तरित्या पथकाने चांगली कामगिरी केली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments