Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

न्यायालयाच्या निर्णयानंतर चिठ्ठी टाकून होणार जामखेड पंचायत समिती सभापतीची निवड


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड दि.३ -जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवड प्रक्रिया दरम्यान समान मतदान झाल्याने व न्यायालयाच्या आदेशानुसार आज निवडीचा निकाल घोषित न करण्याचा आदेश दिल्याने सभापती पदाच्या निवडीचा तीढा कायम राहीला. लवकरच न्यायालयाच्या पुढील निर्णयानंतर चिठ्ठीद्वारे सभापतीपदाची निवड जाहीर होणार असल्याची माहिती पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. 

शुक्रवार दि.३ जुलै रोजी जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभा बोलावण्यात आली होती. त्यानुसार सभापती पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी होते या वेळी पंचायत समिती सदस्या सौ. मनिषा रवींद्र सुरवसे आणि दुसर्‍या पंचायत समिती सदस्या सौ. राजश्री सुर्यकांत मोरे, आणि पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान सदाशिव मुरुमकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु सभापती पद महिलेसाठी आरक्षित आसल्याने डॉ. भगवान सदाशिव मुरुमकर यांनी मागासप्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा छाणनी मध्ये बाद करण्यात आला. त्यामुळे सभापती पदासाठी सौ मनिषा सुरवसे आणि सौ राजश्री मोरे या दोन सदस्यांचे अर्ज राहिले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी मतदान घेतले.
या दरम्यान सदस्यांचे संख्या बळ चार असल्याने मतदान हात उंचावून घेण्यात आले. त्यानुसार राजश्री सुर्यकांत मोरे व मनिषा रवींद्र सुरवसे यांना समान मतदान झाले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार सभापती पद हे जाहीर न करण्याचा आदेश असल्याने सभापती पदाचा निकाल हा न्यायालयाच्या आदेशानंतर व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सभापती निवडीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments