Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या सुरक्षेत तैनात असताना कोटय़वधींची माया ! ; तडकाफडकी काढले


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नागपूर : शहर पोलीस दलातील एका सुरक्षारक्षकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेसाठी असताना या दरम्यान, कोटयवधी रुपयांची माया जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर ना. गडकरी यांनी तडकाफडकी त्याला आपल्या ताफ्यातून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
१७ वर्षांआधी नागपूर शहर पोलीस दलातील राजेश नावाचा पोलीस शिपाई गडकरींच्या सुरक्षेत तैनात करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत तो त्यांच्याकडेच कामाला होता. गडकरींचा विश्वासू सुरक्षा रक्षक असल्याचे सर्वाना तो परिचित होता. या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने गडकरींकडे येणाऱ्या लोकांना त्यांची कामे करवून देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधींची संपत्ती जमवली. गेल्या काही वर्षांपूर्वी महाल येथील नटराज सिनेमागृहाची जागा विकत घेतली. आता त्या ठिकाणी  निवासी सदनिका उभारण्याची त्याची योजना आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका व्यावसायिकाचे काम करवून देण्यासाठी तीन कोटी रुपये घेतले. काम न झाल्याने व्यावसायिकाने गडकरींशी संपर्क साधला असता शिपायाचे बिंग फुटले. गडकरींनी इतरांच्या माध्यमातून त्याची माहिती गोळा केली असता त्याने १७ वर्षांत कोटय़वधींची माया जमवल्याचे समोर आले. यानंतर गडकरींनी त्याला संबंधिताचे तीन कोटी परत करण्यास सांगितले. पण, त्याने पैसे परत केले नाही. शेवटी गडकरींनी त्याची सेवा खंडित करून पुन्हा पोलीस मुख्यालयात पाठवले.

Post a Comment

0 Comments