Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रियकाराबरोबर घरातच केला मुलीने प्रताप


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - शहरातील नारपोली भागात कामतघर येथील अष्टविनायक बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. दिवसाढवळ्या हा चोरीचा प्रताप घडल्यानं कुटूबियांसह पोलिसांनाही धक्काच बसला. या घरफोडीत तब्बल 13 लाख 21 हजार किंमतीचे सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
मात्र नारपोली पोलिसांच्या चौकशी दरम्यान या प्रकरणाचा अजब खुलासा समोर आला आहे. कामतघर येथील सोनगीरकर कुटूंबीयांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाली. विशेष बाब म्हणजे मुख्य दरवाजाचे लॅच बनावट चावीनं उघडून ही चोरी करण्यात आली. यामुळे या चोरीत कुटुंबीयातीलच व्यक्तीचा हात असू शकतो, असा अंदाज पोलिसांना आला.
सोनगीरकर यांची मुलगी बिएचएमएसच्या प्रथम वर्षास शिकण्यासाठी होती. पोलिसांनी या मुलीकडे सदर घटनेची चौकशी केली असता तीच्या बोलण्यातील विसंगती पोलिसांच्या लगेच लक्षात आली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आपल्या प्रियकराला सोबत घेऊन हे कृत्य केलं असल्याचं तरूणीनं कबूल केलं.
प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करायचं असल्यानं स्वतः घरातल्या मुलीनंच हा चोरीचा कट रचला. याप्रकरणी पोलिसांनी प्रतीक तुषार लाळे (वय 21) आणि हेमंत दिलीप सैंदाणे(वय 21) या आरोपींना अटक केली आहे.


Post a Comment

0 Comments