Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्लातुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नवी दिल्ली : कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी जगभरातील डॉक्टर, संशोधक रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. एखादी लस तयार होण्यासाठी लागणाऱ्या अनेक वर्षांचा काळ आता काही महिन्यांपर्यंत कमी करण्यासाठी या सर्वांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या लसचा शोध लागूपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता, अंतर आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सल्ला दिला आहे (Ayurvedic Corona Kadha by Ayush. याचाच भाग म्हणून मध्यंतरीच्या काळात आयुष मंत्रालयाकडून काही आयुर्वेदीक गोळ्यांची शिफारस करण्यात आली. यानंतर आता आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे (Immunity Booster for corona by Ayush Mantralaya).
आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येईल, असं सांगण्यात येत आहे. (Naturally Boost Immunity) आयुष मंत्रालयाने देखील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा पिण्यास सांगितले आहे. तसेच राज्यांना योग्य प्रकारे काढा बनवण्याच्या पद्धतीची देखील माहिती देण्यात आली आहे. यात अनेक प्रकारच्या इम्युनिटी बूस्टरविषयी टिप्स देण्यात आल्या आहेत.
काढा बनवण्याची योग्य पद्धत –
सर्वात आधी काढा बनवण्यासाठी काढ्याच्या प्रमाणात एकूण सामुग्रीपटीत चार भाग तुळशीची पानं, दो भाग दालचिनी, दोन भाग सुंठ आणि एक भाग काळे मिरे घ्या. हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 3 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या.

Post a Comment

0 Comments