Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंंची चलेंज


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
बीड - पालकमंत्र्यांकडून परळीच्या जनतेची फसवणूक केली जात आहे.133 कोटी रुपयांचा कामाचा फक्त डीपीआर मंजूर आहे. डीपीआर मंजूर होणं आणि पैशाची तरतूद होणं यात फार मोठा फरक आहे. आपल्या परळीच्या तिर्थक्षेत्रासाठी, 133 कोटी रुपये आणले म्हणून डिजिटल लावून सांगितलं. मात्र पैशाची तरतूद फक्त दहा कोटीचे आहे. आणि हे जर खोटं असेल तर, ” याच व्यासपीठावर परळीकरांच्या समोर त्यांनी यावं आणि मी येतो मग होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. ” असं खुलं चॅलेंज पंकजा मुंडे यांना दिलं असून धनंजय मुंडे यांनी 133 कोटी रुपयांच्या कामाबाबत मोठा गौफ्यस्फोट केला आहे. यामुळं परळी शहरात चांगलीचं खळबळ उडालीय. परळी शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी, राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

मी परळीच्या विकासाचा ध्यास घेतला असताना ज्यांच्यावर विकास करण्याची खरी जबाबदारी आहे, त्या भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र विकासात आडकाठी आणण्याचे पाप केले आहे. त्यांच्या या वृत्तीमुळेच परळीच्या महत्वकांक्षी 110 कोटी रूपयांच्या भूमिगत गटारी योजना व मलनिस्सारण प्रकल्पाला अडीच महिन्यांचा विलंब झाला आहे. मात्र विकासात आडवे येणार्‍यांना परळीची जनता मतदानातून यावेळी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
परळी नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे प्रत्येक विकास कामात अडथळा आणला जातो, त्यासाठी केजच्या आमदाराला पुढे करून लक्षवेधी लावल्या जातात, नगरपालिकेचा निधी बांधकाम विभागाकडे वळवला जातो. अल्पसंख्यांक विभागाचा निधी अडवला जातो, अशा प्रकारचे राजकारण करण्यापेक्षा 10 वर्ष आमदार, 5 वर्ष मंत्री असताना काय कामे केली आणि काय झाले नाही ? हे सांगण्यासाठी एकदा खुल्या व्यासपीठावर येवुन चर्चा करा, असे आवाहन त्यांनी दिले. अडवा-अडवीचे हे राजकारण मला ही करता येवु शकते, वैद्यनाथ बँकेतला भोंगळ कारभार, वैद्यनाथ कारखान्यातील 6 माणसांचा झालेला मृत्यु हे विषय मी काढले असते, तर संपुर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले असते. याची जाणीव करून दिली, मात्र मला कोणाच्या विरोधात लढायचे नाही, विकासाचे राजकारण करायचे आहे. माझी लढाई ही सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी असल्याचा उच्चार त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments