Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यातील ३७ रुग्णांची कोरोनावर मात ; शुक्रवारी वाढले २४ रुग्णआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३ - जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३२, अकोले तालुका २, जामखेड,राहाता,संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. याचबरोबर आज येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
नगर शहरातील १४ यामध्ये सिद्धार्थ नगर ५, पद्मा नगर ३, नालेगाव २, दसरेनगर १, चितळे रोड १, अवसरकर मळा, सारसनगर १, कलानगर १ भिंगार २, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) १, दाढ बु. (राहाता) १, खेरडे (पाथर्डी) १, भोंदरे (पारनेर) १, केसापुर (राहुरी) १, कोळगाव (श्रीगोंदा) १
जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या; ३६९, उपचार घेत असलेले रुग्ण : १४९, एकूण रुग्ण संख्या : ५३३

Post a Comment

0 Comments