Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेकटे श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी व चांदीच्या मुकुटावर चोरट्यांचा डल्ला.....! ; २५ ते ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव -तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या शेकटे बु. या गावात दि. १जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी येथील ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी उचलून नेली व देवीचा ५० ते ६० ग्रॅमचा चांदीचा मुकुटही चोरून चोरटे पसार झाले. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी आहे की, दि. ०२ रोजी गुरुवारी सकाळी श्री महालक्ष्मी मंदिरातील पूजा आणि सफसफाई करणारे पुजारी छबु मिसाळ हे सफसफाई करण्यासाठी मंदीरात आले असता त्यांनी पाहिले की मंदिरात दान पेटी नाही, देवीचे चांदीचे ५० ते ६० ग्रॅमचे ५ हजार रुपये किमतीचे असलेले मुकुटही नाही. इतर सामानाचीही उचकापाचक केलेली आहे. हा सर्व प्रकार त्यांचा लक्षात येताच त्यांनी गावकऱ्यांना चोरीची कल्पना दिली आणि ही वार्ता गावकऱ्यांना समजताच गावातील ग्रामस्थ हे मंदिराजवळ जमले आणि येथील ग्रामस्थांनी बोधेगाव दुरक्षेत्राला चोरीची माहिती दिली असता, तात्काळ बोधेगाव पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस नाईक अण्णा पवार , पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून वरिष्ठांशी संपर्क केला व घटनेची सविस्तर माहिती दिली. दरम्यान मंदिराच्या जवळच असलेल्या आण्णासाहेब गरड यांच्याशेतात दानपेटी फुटलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलीसांनी घटनेची पाहणी केली.यावेळी घटनेची माहिती मिळताच शेवगाव-पाथर्डीचे उपविभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे, शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस नाईक अण्णा पवार, पोलीस नाईक महादेव घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब नागरगोजे, भनाजी काळोखे, उमेश गायकवाड, राजेंद्र ढाकणे तसेच अहमदनगर येथील श्वानपथक देखील ळी घटनादाखल झाले होते. 
दरम्यान शेकटे बु. येथे झालेल्या चोरीचा तपास तातडीने लावावा अन्यथा शेकटे बु. येथील ग्रामस्थ तसेच भाविकांंसह शेवगाव पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचाही इशारा यावेळी सामाजिक कार्यकते तथा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हरीभाऊ फाटे यांनी दिला आला आहे.

 बोधेगाव भागातील अद्याप मागील चोऱ्यांचा अजूनही तपास नाही 
बोधेगावसह परिसरातील शेकटे, सुकळी, हातगाव,बालमटाकळी मुंगी , लाडजळगाव आदी सह बाजार पेठेतील गावासह सर्वसामान्य जनतेबरोबरच येथील मंदिरे, बाजारपेठा , दुकाने सुरक्षित राहिल्या नाहीत. मागील झालेल्या चोरीचाही तपास अद्याप लागलेला नाही. या भागात घरफोडी, मोबाईल चोरी, वाहन चोरी आदी भुरट्या चोऱ्यांमध्ये सातत्याने वाढ झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments