Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिल ठार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.२८- तालुक्यातील चिखर्डे येथील पांगरी रोडवर भरधाव वेगाने जाणार्या अज्ञात वाहानाने  धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. 
  चिखर्डे तालुका बार्शी येथील महानंदा दत्तू कोंढारे ( वय ६५), सुशिला माधव पाचकवडे (वय ७०) या दोन महीला सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी गावापासून १ किलोमीटर अंतरावर चिखर्डे - पांगरी रोडवर सकाळी ६ च्या सुमारास  मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या.  परत येत असतांना अज्ञात वहानाने जोरदार धडक दिल्याने दोघिंचा जागीच मृत्यू झाला. सकाळ ची वेळ असल्याने जवळपास कोणीही नव्हते त्याचा फायदा घेऊन वाहन चालक वाहनासह फरार झाला.
   सदर घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि . सुधीर तोरडमल , हवलदार सतिश कोठावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून मृतदेहाचे पंचनामे  केले व प्रेते शवविच्छेदनासाठी पांगरी तालुका बार्शी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले. 
  सदर घटनेची पांगरी तालुका बार्शी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून पूढील तपास चालू केला आहे.


Post a Comment

0 Comments