Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिसांनी औषध विक्रेते, खाजगी डाॅक्टर्स यांना पाठवल्या नोटीसा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.२३-  COVID-19 या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाकडून खाजगी डाॅक्टर्सनी करोना सदृश्य आलेल्या प्रत्येक पेशंट वर उपचार करताना त्याचे नाव गाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर ,सविस्तर माहिती घेऊन प्रशासनास कळवणे बंधनकारक केले ले आहे. औषध विक्रेत्यांनी, ग्राहकांनी करोना सदृश्य औषधाची डाॅक्टर चिठ्ठी शिवाय औषधे मागितल्यावर ती देवू नये, दिल्यास त्या पेशंटची माहिती घेऊन प्रशासनास माहिती देणे अपेक्षित आहे.
 पोलिस अधीक्षक मनोज पाटील लाॅकडाऊन ड्युटी बजावत असताना बार्शीतील काही खाजगी डाॅक्टर्स व औषध विक्रेत्यांकडून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यामुळे सीआरपीसी,बीपी,प्रमाणे त्यांना नोटीसा दिल्या असल्याचे बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments