Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुर्‍हाणनगर पाणी योजनेच्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामाला सुरुवात ; माजीमंत्री कर्डिले यांंच्याकडून दुरुस्ती कामाची पाहणीआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१ : मुळा धरणातून बुर्‍हानगरसह 44 गावांना पाणीपुरवठा करणारी बुर्‍हाणनगर पाणी योजना मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे वडगावगुप्ता येथील नदीवरील जलवाहिणी वाहून गेली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून 44 गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. हे काम त्वरित सुरू व्हावे, यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार आज कामाला प्रत्यक्षात सुुरुवात झाली. सध्या नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे जलवाहिणी दुरुस्त करण्यात अडचणी येत आहेत. तरी येत्या 2-3 दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे वडगावगुप्ता नदीवरील जलवाहिनी वाहून गेल्यामुळे बुर्‍हाणनगर पाणीयोजनेची जलवाहिणी दुरुस्ती कामाची पाहणी करताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले व सरपंच, ग्रामस्थ, प्रशासक व कामगार.
यावेळी माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्याला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी 1998 साली 400 एमएमची मुळा धरण ते बुर्‍हाणनगरसह 44 गावांच्या पाणी योजनेला मंजुरी आणली होती. त्यामुळे या गावाचा पाणीप्रश्न संपुष्टात आला होता. मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे जलवाहिनी वाहून गेली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तरी लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरु व्हावा, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरवा केल्यामुळे आज कामाला प्रत्यक्षात सुरु झाले आहे. काम सुरु असताना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे काम करताना अडचणी येत आहेत. तरी लवकरात लवकर हे काम संपवून पाणीपुरवठा सुरळित होण्याची सूचना केली.


नगर ः अतिवृष्टीमुळे वडगावगुप्ता नदीवरील जलवाहिनी वाहून गेल्यामुळे बुर्‍हाणनगर पाणीयोजनेची जलवाहिणी दुरुस्ती कामाची पाहणी करताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले व सरपंच, ग्रामस्थ, प्रशासक व कामगार

Post a Comment

0 Comments