Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच यांचीच नेमणूक करावी - प्रा भानुदास बेरडआँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.१७- भाजपा अहमदनगरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री ना. ऊद्धव ठाकरे यांना पत्र पाठवुन महाराष्ट्र मध्ये मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंच यांचीच नेमणूक करावी व काही राजकीय पक्षाकडून होणारा घोडेबाजार थांबवावा अशी मागणी केली आहे. 

कोरोना महामारी च्या प्रसंगी प्रत्यक गावाने विद्यमान सरपंच यांच्या च नेतृत्वा खाली यशस्वी लढा दिला आहे, त्याच बरोबर अनेक विकास कामे चालु आहेत जर सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही पक्षा कडून घोडेबाजारच्या आधारावर जर प्रशासक यांच्या नेमणुका जर झाल्या तर विकास कामाना खिळ बसेल व गावाची राजकीय सामाजिक घडी विस्कटेल व गावातील वातावरण कलुषित होईल त्या मुळे विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नेमले पाहिजे, राजकिय अस्थिरता निर्माण झाल्यास पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना काळजीवाहु म्हणून काम पाहण्यास सांगीतले जाते त्या प्रमाणे ग्राम पंचायत बाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Post a Comment

0 Comments