Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी कट्टा, जिवंत काडतूसासह आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पारनेर दि.१- खूनाचा प्रयत्न करणारा आरोपीस गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूसासह पोलिसांनी जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई
केली. अनिकेत दत्तात्रय कोठवळे (वय २३, रा.सांगवी सुर्या, ता.पारनेर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, सांगवी सुर्या येथे अनिकेत कोठावळे व सुधीर कोठावळे (दोघ रा.सांगवी सुर्या, ता.पारनेर) यांनी विलास रामदास कोठामळे हा.मु.नाशिक फाटा, पिंपरी चिंचवड, ता.हवेली,जि.पुणे) यांना त्यांची सांगवी सुर्या येथील शेतजमीन ही दारुचा धंदा करण्यासाठी दिली आहे. याचा मनात धरून विलास कोठावळे यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अनिकेत कोठामळे याने त्याचेजवळील तलावारीने तुकडे करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याबाबतची माहिती स्था.गु.शा.चे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. माहितीनुसार खबऱ्यामार्फत आरोपींच्या वास्तव्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा लावला असता, पोलीसांची चाहूल लागताच, तो पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करुन अनिकेत कोठावळे याला पकडले. त्याच्या अंगाची झडतीमध्ये कमरेला खोचलेला २५ हजार रु.गावठी बनावटीचे पिस्टल व ४०० रु.चे दोन जिवंत काडतूसे आणि १० हजार रु.चे सँमसंग कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल असा एकूण ३५ हजार ४०० रु.चा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घडलेल्या घटनेबाबत  विलास रामदास कोठावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४२४/२०२० भादवि कलम ३०७,३४१,५०६,५०७,३४ सह आर्म अँक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपी अनिकेत दत्तात्रय कोठावळे पारनेर पोलीसाचा ताब्यात दिले. 
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई गणेश इंगळे, पोहेकाँ दत्ता हिंगडे, बबन मखरे, पोना सुनिल चव्हाण, रविंद्र कर्डीले, भागीनाथ पंचमुख, आण्णा पवार, सचिन आडबल, पोकाँ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, प्रकाश वाघ, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments