Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदीरात प्रवेश बंद ; गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना शिर्डीमध्ये पालखी आणण्यास प्रतिबंध ; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी,दि.3 : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या असून शिर्डी येथील श्री साई मंदीरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 5 जुलै,2020 रोजी श्री साई मंदीर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही. तसेच यासाठी भाविकांना आणि विविध ठिकाणांहून येणाऱ्या पालख्यांना प्रशासनातर्फे पास देण्यात येणार नाही. उपरेाक्त कालावधीत भाविकांनी शिर्डी येथे येऊ नसे तसेच पालख्या शिर्डी येथे आणू नये असे आवाहन जिल्हा व तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, अहमनगर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. सदरहू आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास संबधितांविरुध्द साथरोग अधिनियम 1897 चे कलम 188, भारतीय दंड संहिता व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 56 अन्वये दंडनिय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.      

Post a Comment

0 Comments