Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महापालिका हद्दीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना ; सायं. ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर फिरण्यास प्रतिबंध


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर, दि. 3 - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा  एक भाग म्‍हणुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर महापालिका हद्दीमध्ये कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास दि. 3 जूलै रोजीपासुन ते दि.17 जूलै  रोजीपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. याशिवाय या कालावधीत सायंकाळी 7 ते पहाटे पाच या कालावधीत तातडीच्या वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त व्यक्तींच्या हालचालींस परवानगी असणार नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  सायंकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत कन्टेन्मेंट झोन वगळता खालील बाबतीत हे आदेश लागू राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्‍थापना यांचेकडील कर्तव्‍यावर असलेले अधिकारी व कर्मचारी. रुग्‍णालय, दवाखाने, औषधे, फार्मा, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी संबंधीत आस्‍थापना. इलेक्‍ट्रीसिटी, पेट्रालियम, ऑर्इल आणि ऊर्जा संबंधीत व्‍यक्‍ती / आस्‍थापना. दूरसंचार, इंटरनेट सेवा पुरविणा-या आस्‍थापना. प्रसारमाध्यमे प्रतिनिधी (मीडिया) (जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडील वैध ओळखपत्र असलेले प्रतिनिधी), अन्न धान्य, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे होम डिलीवरी सेवा, पिण्याचे पाणी पुरवठा व दुरुस्तीविषयक कामकाज संबंधित, मालवाहतूक करणारे ट्रक्स, टेम्पो.
  उपरोक्त कालावधीत सकाळी 5 ते सायंकाळी 7 या कालावधीत यापूर्वीच्या आदेशानुसार परवानगी असलेले व्यवहार, कृती, क्रिया (एक्टीव्हीटीज) सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी कन्टेमेंट झोन वगळता जवळच्या/लगतच्या परिसरामध्ये हालचालीस परवानगी राहील. शहराच्या दूरच्या भागामध्ये हालचालीस परवानगी असणार नाही.
     कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना, यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments