Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीतील दोघे गावठी कट्ट्यासह अटक ; एलसीबीचा कारवाईचा धडका


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.२- पाथर्डी ते खरवंडी कासार रस्त्यावरील तुळजवाडी फाटा येथे एलसीबी पथकाने सापळा लावून काळ्या रंंगाच्या पल्सर २२० दुचाकीवरील दोघांना पकडण्यात आले. रोहिदास उर्फ रोहित अशोक गायकवाड (वय २३, रा.खरवंडी कासार ता.पाथर्डी), दादासाहेब उर्फ लक्ष्मण मल्हारी वाळके (वय २०, रा.कोरडगाव ता.पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. याची एलसीबी पथकाने पंचासमक्ष झडती घेतली असता, २५ हजार रु.किंमतीची गावठी बनावटीचे कट्टा, ४०० रु.किंमतीचे जिवंत काडतूसे व १ लाख रु.चे बजाज पल्सर (एमएच ३, डीएफ ९२२२) असा एकूण १ लाख २५ हजार ४०० रु.चा मुद्देमाल जप्त केला. स्था.गु.शा.चे पोकाँ संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोना ज्ञानेश्वर शिंदे, रविंद्र कर्डीले, रवि सोनटक्के, पोकाँ रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, संदीप चव्हाण, मेघराज कोल्हे, चापोहेकाँ संभाजी कोतकर आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments