Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संस्थात्मक विलगीकरण करण्यास दुर्लक्ष केल्यास सरपंचावर होणार कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -  अहमदनगर शहरात व तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असुन तहसिल कार्यालय, अहमदनगर यांचे मार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या असून जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये कोरोना विषाणू (कोव्हीड-19) या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावपातळीवर ग्राम स्तरीय सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंचाची नेमणूक करण्यात आलेली असुन त्यांनी करावयाचे कामकाजाबाबत आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार परराज्यातुन  व जिल्हा बाहेरुन आलेली व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरण करणेबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या. तरीपण काही ठिकाणी सरपंच तथा ग्रामस्तरीय  सुरक्षा समिती हे बाहेरुन आलेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करुन संस्थात्मक विलगीकरण करण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुर्वी देखील सरपंच निंबळक, सरपंच जखणगाव, सरपंच भोयरेपठार यांना अक्षम्य दुर्लक्षतेमुळे व हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांचे विरुध्द भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 56 व भारतीय साथ रोग प्रतिबंध अधिनियम 1897 अन्वये व भारतीय दंड संहीता कलम 269 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये याबाबत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. तरी यापुढे अशा प्रकारचे दुर्लक्ष ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य यांनी केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेविरुध्द सदर कलमान्वये फौजदारी कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे अहमदनगर तालुका दंडाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन,  यांनी म्हटले आहे.

                   

Post a Comment

0 Comments