Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना उपचारासाठी राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क खासगी रुग्णालयांनी आकारावे : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर, दि.१३-  जिल्ह्यातील ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-१९ आजारावर उपचार करण्यात येत आहेत, अशा रुग्णालयांनी रुग्णाकडून राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे आणि सदर दरफलक दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालय ही कोरोना आजारावर उपचार करत आहेत. अशा रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच अवास्तव शुल्क त्यांच्याकडून आकारले जाऊ नये यासाठी राज्य शासनाने अशा रुग्णालयांसाठी उपचाराच्या अनुषंगाने जर निश्चित करून दिले आहेत. या रुग्णालयांनी कोविड-१९ उपचाराच्या संदर्भातील हे दर पत्रक त्यांच्या रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत. जेणेकरून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याची माहिती होऊ शकेल. तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत निकषानुसार पात्र असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
     ज्याप्रमाणे खाजगी प्रयोगशाळांना कोविड-१९ चाचणीसाठी राज्य शासनाने दर आकारणी निश्चित केली आहे, त्याच पद्धतीने कोविंड संदर्भात उपचारांसाठी ही राज्य शासनाने दर ठरवून दिले आहेत. रुग्णालयांनी त्याच पद्धतीने शुल्क आकारणी करावी, असे जिल्‍हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी आकारणी केली जाऊ नये, सर्वसामान्य रुग्णांचे हित जपले जावे, यादृष्टीकोनातून हे निर्देश देण्यात आले आहेत.
      या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यात साधे बेड, फक्त ऑक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित केले आहेत.  त्यामुळे या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशानुसार कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले असून दर दिवसाला जास्तीत जास्त ४०००, ७५०० व  ९००० रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत.
      सर्वसाधारण वॉर्ड आणि आयसोलेशन मध्ये रुग्ण असेल तर प्रतिदिवशी ४ हजार रुपये, आयसीयू मध्ये रुग्ण असेल आणि त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता नसेल तसेच आयसोलेशन मध्ये असेल तर प्रतिदिवशी ७ हजार ५०० रुपये आणिआयसीयू वॉर्ड (व्हेंटिलेटरसह) आणि आयसोलेशन यासाठी प्रतिदिवशी ९ हजार रुपये शुल्क आकारावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात, यामध्ये पीपीई कीट, व्रान्कोस्कोपीक प्रोसीजर्स,बायोप्सीज, असायटीक/प्युरल टॅपिंग, सेंट्रल लाईन इन्सर्शन, केमोपोर्ट इन्सर्शन आदींच्या दर आकारणीचा समावेश नाही. हे दर ३१ डिसेंबर, २०१९ च्या रॅक रेटनुसार आकारावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, कोविड चाचणीसाठी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दराने आकारणी करता येईल. त्यापेक्षा जास्त शुल्क घेता येणार नाही. उपचारासाठी वापरले जाणारे इम्युनोग्लोबुलिन्स, मेरोपेनेम, पॅरेन्ट्राल न्युट्रीशन, टॉसिलीझुमॅब आदी औषधी त्यांच्या एमआरपीनुसार स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाईल.   तसेच विविध चाचण्या जसे की, एमआरआय, सीटी स्कॅन, पीईटी  किंवा रुग्णांवर उपचारांसाठी प्रयोगशाळेत केल्या जाणार्‍या आवश्यक चाचण्यासाठीचे शुलक् ही स्वतंत्रपणे आकारले जाईल. त्याचा या दरआकारणीत समावेश नाही.   सध्या या रुग्णालयांना तेथील सुविधानुसार जे दर ठरवून दिले आहेत. या दरामध्ये रुग्णाचे मॉनिटरिंग, सीबीसी तसेच युरीन तपासणी, एचआयव्ही स्पॉट, अॅण्टी एचसीव्ही, युएसजी, २ डी एको, एक्स रे, ईसीजी, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, रायल्स ट्यूव, युरीनरी ट्रॅक्ट कॅथेटरायझेशन आदींचा समावेश आहे.   

Post a Comment

0 Comments