Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहरातील 'त्या' कापड दुकानातील 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह : जामखेडकरांनी सोडला सुटकेचा निश्वास ..!


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड, दि.२५ - कर्जतच्या एका कोरोना बाधितांच्या संपर्कातील जामखेड शहरातील 'एका' मोठ्या कापड दुकानातील 14 कर्मचार्‍यांनासह तालुक्यातील 7 असे 21 जणांचे स्वॅब तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यत आले होते यातील सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने धाकधूक वाढलेल्या जामखेडकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
 याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत येथील एक कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नासाठी बस्ता बांधण्यासाठी जामखेड शहरातील एका मोठ्या कापड दुकानात आले होते त्यानी याठिकाणावरून त्यांनी बस्ता बांधला होता त्यांनंतर काही दिवसांनी संबंधित मुलीच्या वडिलांचा रिपोर्ट पोझीटीव्ह आला आहे त्यानंतर आरोग्य यंत्रणेने संबंधित व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले आहे याचा तपास सुरू केला असता जामखेड शहरातील एका मोठ्या कापड दुकानातील 14 कर्मचार्‍यांची संपर्कात आले आसल्याचे आढळून आले होते त्यामुळे त्या 14 कर्मचार्‍यांना आरोळे हाॅस्पिटल येथे काॅरटाईन करून तालुक्यातील 7 असे 21 जणांचे स्वॅब तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालययात पाठविण्यात आले होते त्यापैकी सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत यातील सर्वाना पुढील सात दिवस जामखेड येथे काॅरटाईन करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी सांगितले दरम्यान अहवाल निगेटिव्ह आल्याने गेल्या दोन दिवसांपासून धाकधुक वाढलेल्या जामखेडकरांना दिलास मिळाला आहे. 

Post a Comment

0 Comments