Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कॉंग्रेसच्या बाळासाहेब भंडारींवर चुकीचा गुन्हा दाखल केल्याची मुख्यमंत्र्याकडे तक्रार


कोरोना परिस्थिती हाताळण्यात सिव्हील हॉस्पिटलच्या अक्षम्य हलगर्जीपणाची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ घेतली दखल
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२४- सिव्हील हॉस्पिटलची कोरोनाशी मुकाबला करणारी यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडली आहे. याला जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा जबाबदार आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह सुमारे चार तासां पेक्षा जास्त काळ माझ्या रुग्ण नातेवाईकांच्या बाजूला तसाच पडून असल्या बाबत जाब विचारणाऱ्या कॉंग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याची तक्रार भंडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ दाखल घेतली आहे.
सिव्हील हॉस्पिटलने केवळ आपला अक्षम्य निष्काळजीपणा आणि गैर कारभार लपविण्याच्या हेतूनेच माझ्या विरुद्ध खोटी व चुकीची फिर्याद दाखल केली आहे. या खोट्या फिर्यादीसंदर्भात दाद मागण्यासाठी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ,  महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात तसेच  आरोग्य विभागाचे सचिव आणि नाशिक विभागीय आयुक्त यांना ईमेलद्वारे सविस्तर निवेदन तसेच जिल्हा रुग्णालयाविषयी मी केलेले गंभीर आरोप व त्या पुष्ट्यर्थ व्हिडिओ चित्रीकरणाचे आवश्यक भक्कम पुरावे पाठविले असल्याचे भंडारी यांनी पत्रकात म्हटले आहे.
दि. १९ जुलैला ही घटना घडली. सिव्हील हॉस्पिटलच्या कोरोना अति दक्षता विभागात भंडारी यांच्या नातेवाईक असणाऱ्या ७२ वर्षीय महिला कोरोना रुग्णाच्या समोर असुरुक्षित अंतरावर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह ठेवण्यात आला होता. सदर मृतदेह केवळ चादर टाकून झाकण्यात आला होता. वास्तविक पाहता सरकारच्या निर्देशांनुसार कोरोना मृतदेहावर विशिष्ट वैद्यकीय प्रक्रिया करून तात्काळ त्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागते. इतरांना यातून संसर्ग होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते.
परंतु तब्बल चार तास उलटले तरी तिथे उपस्थित डॉक्टर, नर्स यांना वारंवार विनंती करून देखील मृतदेह हलविला जात नसल्यामुळे वयोवृद्ध महिला कोरोना रुग्णाचा रक्तदाब वाढू लागला. त्या या प्रकारामुळे भयभीत झाल्या. त्याच वेळी भंडारी त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी तिथे पोहोचले. त्यावेळी रुग्णाने भंडारी यांना याबाबत सांगितले.
भंडारी यांनी हा गंभीर प्रकार पहिल्या नंतर त्यांना देखील धक्का बसला. त्यांनी उपस्थित स्टाफला याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी नोडल अधिकारी बापूसाहेब गाढे यांच्याशी संपर्क साधला असता असे होणार नाही असे म्हणत त्यांनी हात झटकले. भंडारी यांनी डॉ. गाढे सद्यपरिस्थितीचा व्हिडिओ आपल्याला पाठवू का असे विचारले असता त्यांनी पाठवा असे सूचित केले, असे भंडारी यांनी पत्रकात म्हटले आहे.
त्यामुळे मी या गंभीर प्रकारचे चित्रीकरण माझ्या मोबाईल मध्ये केले. जाब विचारला. जिल्हा शल्य चिकित्सक यांना याबाबत विचारणा केली. या घटनेची प्रसार माध्यमांनी देखील दखल घेतली. घडल्या प्रकारामुळे आपले उघडे पडलेले पितळ झाकण्यासाठी जिल्ह्य आरोग्य यंत्रणेने माझी काही चूक नसताना देखील मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत माझ्यावरच रात्रीतून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे नाईलाजास्तव मी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचे भंडारी यांनी पत्रकात म्हटले आहे.   

जिल्हा शल्य चिकीत्सकांवर काय कारवाई केली ?
ज्या अक्षम्य गंभीर प्रकाराला मी वाचा फोडली त्याबाबत जिल्हा प्रशासन प्रमुखांनी जिल्हा चिकीत्सकांवर काय कारवाई केली असा सवाल बाळासाहेब भंडारी यांनी केला आहे. संकट मोठे आहे. आम्ही देखील प्रशासनाला सुरुवाती पासून मदत करीत आलो आहोत. पण प्रशासनाने संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. अन्यथा आता नागरिकच रस्त्यांवर उतरतील आणि उद्रेक होईल अशी खंत भंडारी यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. प्रदीप मुरंबीकरांच्या चौकशीची मागणी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि संबंधितांची शासनाने तात्काळ चौकशी करावी कशी मागणी बाल;बाळासाहेब भंडारी यांनी लेखी निवेदना द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे केली आहे. चौकशी करून संबंधितांवर शासनाने कडक कारवाई करावी असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक,
संबंधितांवर गुन्हा दाखल करणार
कोरोना अतिदक्षता विभागात माझ्या चुलतींच्या समोर सुमारे चार तास कोरोना पेशंटचा मृतदेह कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया न करता ठेवून माझ्या चुलतीच्या जिवास धोका निर्माण केल्या प्रकरणी तसेच कोरोना बाधित पेशंटचा मृतदेह कोणतीही वैद्यकीय अथवा रासायनिक प्रक्रिया न करता हॉस्पिटल मधुन बाहेर काढून तसाच विल्हेवाटीसाठी नेऊन नागरिकांचे व सार्वजनिक आरोग्य गंभीररित्या धोक्यात आणल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक व सबंधित ड्युटीवरील स्टाफ यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची तयारी बाळासाहेब भंडारी यांनी केली असून त्यांच्या होम क्वारंटाईनची मुदत संपल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.

Post a Comment

0 Comments