Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ब्युटीपार्लर महिलेसह एकाकडून युवतीला अश्‍लील फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग


युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य सुत्रधार महिलेसह अन्वरवर गुन्हा दाखल
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अमरावती : काही दिवसांपूर्वी युवतीची ओळख एका ब्युटी पार्लरच्या महिलेशी झाली. युवती ही तिच्या ब्युटीपार्लरमध्ये चेहरा मसाजसाठी जात होती. या दरम्यान, महिला नेहमी तिला पाणी पिण्यास देऊन याने शरीर चांगले राहते, असे खोटे तिला सांगितले जात. यानंतर तिचे अश्‍लील फोटो काढून संबंधित युवतीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. याबाबत युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य सुत्रधार महिलेसह अन्वरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, युवतीची काही दिवसांपूर्वी ओळख एका ब्युटी पार्लरच्या महिलेशी झाली. त्या महिलेने तिची ओळख अन्वर हुसेन मेहमूद हुसेन (रा. पॅराडाइज कॉलनी) याच्यासोबत करून दिली. अन्वरने त्या युवतीला प्रथम आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर लग्नाचा प्रस्ताव मांडला . युवतीचा विश्‍वास संपादन केल्यावर अन्वर व ब्युटी पार्लरच्या 
महिलेने युवतीला अश्‍लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अन्वरने त्याआधारे युवतीकडून ४ लाख तर ब्युटीपार्लर चालविणाऱ्या महिलेने एक लाख रुपये घेतले.
यानंतरही महिला युवतीला मसाज करण्याच्या बहाण्याने ताजनगरात नेहमीच घेऊन जायची. तेथेच अन्वरने चार वेळा आपल्यावर अत्याचार केला, असे तक्रारीत युवतीने नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी महिलेने अन्वरसोबत युवतीला चिखलदरा येथे नेले. तेथे अन्वरने तिच्यावर अत्याचार केला. युवतीच्या तक्रारीवरून अन्वर हुसेनसह कटात सहभागी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी सांगितले. 
लिंबू सरबतमध्ये दिले गुंगीचे औषध
ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या महिलेने मसाजसाठी येणाऱ्या युवतीला लिंबू सरबतमध्ये दिले गुंगीचे औषध देण्यात सुरुवात केली. हे पाणी पिल्याने शरीर चांगले राहते, अशी बतावणी केली. युवती बेशुध्द झाल्यानंतर अश्‍लील फोटो काढून ठेवले. वर्षभरापासून अश्‍लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करणे सुरू केले. तसेच दुसऱ्याला ते फोटो देऊन अत्याचार केला. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य सुत्रधार महिलेसह अन्वरवर गुन्हा दाखल केला आहे. 
सततची धमकी, अत्याचार व पैशांच्या मागणीला कंटाळून युवतीने नागपुरीगेट पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 30) गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून अन्वर हुसेनविरुद्ध अत्याचारासह खंडणी वसुली, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तर महिलेविरुद्ध अन्वरला कटात सहकार्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अन्वरने युवतीला तिचे लग्न दुसऱ्यासोबत होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्याच्याकडे लग्नाचा पुरावा असल्याचे सांगून ब्लॅकमेल करीत अत्याचार करीत होता, असेही पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.


Post a Comment

0 Comments