Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तालुका वैद्यकिय अधिकारी आणि प्रांताधिकारी यांचे एकमेकांशी पटेना ; तालुका वैद्यकिय अधिकारी गेले वैद्यकिय रजेवरआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.३१- कोविड १९ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वत्र विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. सर्वत्र समन्वयाने काम करून एकजूटीने काम करताना दिसत आहेत. परंतु बार्शी तालुक्यात असे होताना दिसत नाही बार्शी येथील तालुका वैद्यकिय केंद्रातील आपआपसातील हेवेदावे व कुरबूरी वाढताना दिसत आहेत. कारण येथील तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ संतोष जोगदंड आणि प्रांताधिकारी निकम यांच्यात होत असलेल्या आपआपसातील कुरबूरी..            आणि अचानकच डाॅ संतोष जोगदंड यांनी  त्यांचे माणसीक व शारीरिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे कारण नमूद करून लेखी स्वरुपात जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे दिलेला रजेचा अर्ज व जिल्हा आरोग्य अधिकारी मा बी.टी जमादार यांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन रजा मंजूर करून बार्शी येथील तालुका आरोग्य केंद्रातील  आरोग्य अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार चिखर्डे तालुका बार्शी येथील प्राथमिक आरोग्य  केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारी डाॅ अशोक ढगे यांच्या कडे देण्यात आला आहे 
  डाॅक्टर ढगे यांना चिखर्डे येथील आरोग्य केंद्रातील कामकाज पाहून , बार्शीतील आरोग्य केंद्राच्या कारभार सांभाळावा लागणार आहे...
   त्यामुळे बार्शी येथील आरोग्य केंद्रातील सेवेबद्दल जनतेकडून शंका कुशंका  व्यक्त केल्या  जात आहेत . 

Post a Comment

0 Comments