Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजप कार्यकर्त्यांचे शेतकऱ्यांच्या बांधांवरच केले ठिय्या आंदोलन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बार्शी दि.२९- माजी मुख्यमंत्री मा देवेंद्र फडनविस, चंद्रकांत पाटील, बार्शीचे आमदार मा राजेंद्र राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष,बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने बार्शी तालुक्यातील आलीपूर येथील  शेतकरी धर्मराज सुरवशे यांच्या शेतावरील बांधांवर हे आंदोलन केले .
  बार्शी मंडळ अधिकारी उमेश डोईफोडे यांनी शेतात हजर राहून या आंदोलनाचे निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील शेतकर्यावर  दिवसेंदिवस संकटामध्ये वाढच होत आहे , नकली सोयाबीन बियाण्यामूळे दुबारा केली गेलेली पेरणी ,युरीया खताचा कृत्रिम टंचाई निर्माण करून होत असलेला काळा बाजार , बॅकेकडून कर्जपुरवठा करण्यास होत असलेला नकार यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था  झाली आहे .
  संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करावी,   सोयाबीन बियाण्यामूळे झालेले नुकसानाची भरपाई  मिळावी , व शेतकंर्याना खताचा पुरवठा नियमीतपणे व मुबलक प्रमाणात मिळावा आशी मागणी केली आहे. 
    यावेळी आघाडी सरकार चा निषेध व्यक्त करून घोषणा बाजी ही करण्यात आल्या. जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप तालुकाध्यक्ष मदन दराडे  , शहराध्यक्ष महाविर कदम , पंचायत समिती सदस्य उमेश बारंगुळे , भाजप जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव ,रिपाई शहराध्यक्ष अविनाश गायकवाड ,नगरसेवक संदेश काकडे, रितेश वाघमारे दिपक राऊत , सरपंच अशोक मुंडे, मनोज बोकेफोडे ,दिपक सुरवशे ,पिंटू वायकर , रा .स. प. चे दत्तात्रय देवकर , शंकर वाघमारे ,प्रशांत खराडे ,युवराज ढगे , दिपक ढावारे , पिंटू यादव आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. 

Post a Comment

0 Comments