Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 ; 31 जुलैपर्यंत नावे नोंदविण्याचे कृषी विभागाचे आवाहन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
  अहमदनगर दि.10अहमदनगर जिल्हयात नैसर्गिक आपत्ती व पर्जन्यमानातील अनियिमितता व कमी पाऊस तसेच पावसातील कालावधीमुध्ये मोठा खंड पडतो. कृषि उत्पन्नात मोठया प्रमाणात घट होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकरी बांधवानी प्रधानमंत्री पिक विमा योजनांतर्गत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 
अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून गाव पातळीवर कार्यान्वीत आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) सुविधा उपयोगात आणता येईल. शेतक-यांनी पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधान मंत्री पिकविमा योजनेत दिनांक 31 जुलै 2020 या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, त्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच आपल्या गावातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे बरोबरच नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
    जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. खरीप 2020 पासुन सहभाग घेणेसाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतक-यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधारकार्डाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास नोंदणी पावती सोबत पुढील पैकी कोणतेही एक फोटो ओळख पत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडिट कार्ड किंवा नरेगा जॉब कार्ड किंवा वाहन चालक परवाना. सदर योजनेत सहभागी होणेसाठी कर्जदार शेतकर्‍यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार कार्ड क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
     खरीप हंगाम सन 2016 पासून राज्यात प्रधान मंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्यात येत आहे. भारतीय ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं.लि. मुंबई ही विमा कंपनी यासाठी काम करीत आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
        या पीक विमा योजनेची उद्दीष्ट:- नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासाख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नूकसानिच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे होतू साध्य होण्यास मदत होईल.
        योजनेचे प्रमुख वैशिष्टय:- सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल, प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत, या योजनेअंतर्गत जिल्हयातील ज्या पिकांसाठी  विमा कंपनीने वास्तवदर्शी दराने विमा हप्ता दर 30 टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे, त्यापिकांसाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर राहणार आहे. शेतक-यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी  हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मार्यादित ठेवण्यात आला आहे, या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी  हंगाम 2020-21, खरीप व रब्बी  हंगाम 2021-22, खरीब व रब्बी हंगाम 2022-23 या तीन वर्षाकरीता जोखिमस्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षा पैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. उंबरठा उत्पन्न हे संपूर्ण 3 वर्ष कालावधी करिता स्थिर असेल तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही हा संपूर्ण 3 वर्ष कालावधी करिता स्थिर असेल.
        जोखमीच्या बाबी : योजने अंतर्गत पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. खरीब हंगामा करीता हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामाध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसार, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलीन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान.

जिल्हयातील योजनेत समाविष्ट पीके, विमा संरक्षित रक्कम व विमा हत्पा रक्कम याप्रमाणे - 
जिल्हयातील अधिसूचित पीकांचे नाव
तांदूळ -
जिल्हयातील समाविष्ठ महसूल मंडळे/तालुके संख्या 8 मंडळे -भात (तांदूळ)-
विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर)45000/-, शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) -900/- 
-------
बाजारी - 
महसूल मंडळे/तालुके संख्या 97 मंडळे
बाजारी- विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 22000/- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 440/-
------
भुईमूग - 
महसूल मंडळे/तालुके संख्या  मंडळे 86,
भुईमूग - विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 30000 /- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 600/-
------
सोयाबीन - 
महसूल मंडळे/तालुके संख्या  मंडळे 53,
भुईमूग - विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 37500 /- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 750/-
------
मूग - 
महसूल मंडळे/तालुके संख्या  मंडळे 59,
मूग - विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 20,000 /- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 400/-
------
तूर - 
महसूल मंडळे/तालुके संख्या  मंडळे 79,
तूर - विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 35,000 /- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 700/-
------
उडीद - 
महसूल मंडळे/तालुके संख्या  मंडळे 15,
उडीद- विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 20,000 /- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 400/-
------
कापूस - 
महसूल मंडळे/तालुके संख्या  मंडळे 62,
कापूस- विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 45,000 /- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 2250/-
------
मका - 
महसूल मंडळे/तालुके संख्या  मंडळे 6,
मका- विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 30,000 /- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 600/-
------
कांदा - 
महसूल मंडळे/तालुके संख्या  मंडळे 11,
मका- विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 65,000 /- , शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हत्पा रक्कम रु. (प्रती हेक्टर) 3250/-
------


                                                                

Post a Comment

0 Comments