Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर येथे 2 दिवसापासून बिबट्याचा वावर ; बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा, वाड्या वस्त्यांवर भीतीचे वातावरण


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी दि.१९- सावळीविहीर बु ।। येथे गेल्या दोन दिवसापासून बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सावळीविहिरी वाडीकडे बिबट्या असल्याचे सांगण्यात येत आहे.दोन दिवसापूर्वी सावळीविहीर वाडी परिसरात रात्री फटाके वाजविण्यात आले जेणेकरून जर बिबट्या आपल्या शेतात असेल तर निघून जाईल. परंतु दुसऱ्या दिवशी पागिरे वस्ती, आगलावे वस्तीवर बिबट्या दिसून आला. काहींना ही अफवा असल्याचे वाटले. परंतु रात्री कुत्र्याचा फडशा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात,डाळींबाचे बाग, ऊस, असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे.परिसरात वन विभागातील अधीकारी व कर्मचारी यांनी लक्ष घालून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, तसेच परिसरातील नागरिकांनी रात्री अपरात्री बाहेर पडू नये व स्वताची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments