Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आषाढी एकादशीनिमित्ताने विठू-माऊलीची महापूजा मुख्यमंत्र्यांसमवेत बडे दाम्पत्यांच्या हस्ते संपन्न


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पंढरपूर दि.१- पंढरीच्या वारीत आज (बुधवारी) आषाढी एकादशी निमित्ताने भल्या पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नीसह समवेत महापूजाचा पहिला मान मिळलेले अहमदनगर (पाथर्डी) येथील मानाचे वारकरी विठ्ठल बडे व सौ अनुसाय बडे या दाम्पत्याच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडली.


अहमदनगर जिल्ह्याला विठ्ठल बडे व सौ.अनुसाय बडे या दाम्पत्यांच्या माध्यमातून आषाढी एकादशीला महाराष्ट्रचे दैवत विठु-माऊलीच्या मानाच्या महापूजाचा प्रथम वारकऱ्याच्या रुपाने मोठा मान मिळाला. पंढरीच्या वारीत महापूजाचा मिळालेला मोठा सन्मान हा चिंचपूर पांगुळ (पाथर्डी) येथील बडे दम्पत्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक वारकऱ्यांचा सन्मान झाला आहे, अशी प्रतिक्रिया समस्त वारकऱ्यांतून व्यक्त केली आहे. श्री. बडे कुटुंबाची तिसऱ्या पिढीपासून पंढरीच्या वारीची परंपरा आज रोजीही अखंड सुरु आहे. या भक्ती भावामुळेच वारकरी बडे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील विठ्ठल बडे सहपत्नीसह महापूजाचा मिळालेले माना म्हणजे त्यांचे सौभाग्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

Post a Comment

0 Comments