Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ परिसरात विद्युत पंपांच्या चोरऱ्याने शेतकरी त्रस्त ; चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करा, पंचक्रोशीतून मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / सोमराज बडे
पाथर्डी - तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथील पूर्व भागातील गावातील तसेच बेलपारा मद्यम प्रकल्प काठावरील विद्युत मोटारीं तसेच केबल चोरीला जाण्याचे प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे चिंचपूर पांगुळ, वडगाव, जोगेवाडी, ढाकणवाडी आदिसह वाड्यावस्त्यावरील शेतकऱ्यांनी केली आहे.
विद्युत पंप चोरी संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करुनही चोरांचा थांगपत्ता लागत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पंप चोरी करणाऱयां चोरांना पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी चिंचपुर पांगुळ येथील शेतकरी डॉ अशोक मुरलीधर बडे यांच्या शेतातील विहिरीतील बारा हजार रुपये किंमतीची मोटार चोरट्यांनी रात्री लाबवली. याप्रकरणी अशोक बडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. चिंचपुर,वडगाव ढाकनवाडी गावातील शेतकऱ्यांनी 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत तलावावरून पाईपलाइन करुन, शेतीसाठी पाणी नेले आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून वारंवार पंप चोरीला जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.Post a Comment

0 Comments