Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा ग्राहक मंचाचा महावितरण कंपनीला शॉक ; तक्रारदारास नुकसान भरपाई-खर्चापोटी १५ हजार देण्याचे आदेश


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९ - येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच यांनी ग्राहकास अचानकपणे दोन लाख 37 हजार 290 रुपये विद्युत देयक दिल्यामुळे झालेल्या शारीरिक मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 10 हजार एवढी नुकसान भरपाई देण्याचे आदेश तसेच तक्रार दाखल करणेकामी झालेला खर्च रक्कम रुपये 5 हजाराचा खर्च देण्याचे आदेश महावितरण कंपनीला नुकतेच अहमदनगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच यांनी पारित केला आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की नेवासा तालुक्यातील सोनई येथील श्री भारत रामनाथ दरंदले यांचे कौतुकी नदीपात्रामध्ये दहा बाय दहाच्या दुकानांमध्ये पशुखाद्य विक्रीचा मुंजोबा पशु खाद्य दुकान या नावाने व्यवसाय आहे. सदरील दुकानासाठी श्री दरंदले यांनी महावितरण कंपनीकडून वाणिज्य स्वरूपाचे विद्युत कनेक्शन घेतलेले होते. सदरील विद्युत कनेक्शनचे मीटर फॉल्टी असताना 2014 मध्ये अचानक पणे महावितरण कंपनीने दोन लाख 37 हजार 290 रुपयाचे बिल श्री दरंदले यांना पाठविले. त्याबाबत दरंदले यांनी महावितरण कंपनीकडे वेळोवेळी धाव घेऊन सदरचे बिल दुरुस्त करून देण्याबाबत व मीटर चे दुरुस्तीबाबत विनंती केली. मात्र महावितरण कंपनीने श्री दरंदले यांना बिल कमी करून दिले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव श्री दरंदले यांनी अँड गोरक्ष पालवे यांचेमार्फत अहमदनगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच साहेब यांचे कोर्टात तक्रार दाखल करून दाखल करून न्याय मिळणे कामी विनंती केली. सदरील तक्रारीची जिल्हा ग्राहक मंच अहमदनगर यांच्यासमोर गुणवत्तेवर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती महावितरण कंपनीने मीटर फॉल्टी असतानाही चुकीच्या पद्धतीने श्री दरंदले यांना 2 लाख 37 हजार 290 रुपयाचे बिल दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्री दरंदले यांना जो शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला, त्या नुकसानीपोटी रक्कम रुपये 10000 व दरंदले यांना जिल्हा ग्राहक मंच साहेब यांचेकडे तक्रार दाखल करावी लागली, म्हणून तक्रार खर्चापोटी रक्कम रुपये 5000 देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंच अहमदनगर यांनी पारित केले. तक्रारदार यांचे वतीने अँड. गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला. त्यांना एबी शेख, राहुल अंबरीत, बीबी गर्जे, राजेश खळेकर, दीपक राऊत यांनी सहाय्य केले.

Post a Comment

0 Comments