Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हॉटेलचा दारु विक्री परवाना रद्द करतो, असे सांगून हॉटेल मालकाकडून खंडणी ; एलसीबीची कारवाई

३ लाख रु ची खंडणी मागणारा आरोपी 
१ लाख रु चे रकमेचे खंडणीसह अटकेत 
आँनलाईन न्यूज नेटवर्क /नगर रिपोर्टर

अहमदनगर - तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारु विक्रीसाठी लागणारा परवाना मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता. सदर अर्जावरुन त्यांना दारु विक्रीचा परवाना मिळाला होता त्यावरुन त्यांनी हॉटेल चालु केले होते . यातील आरोपी नामे दिगंबर लक्ष्मण गेंटयाल याने सदर परवाण्याबाबत माहीती अधिकार अन्वये उत्पादन शुल्क विभागाकडे कोणत्या कागदपत्राचे आधारे परवाना दिला. याबाबतची माहीती मागवून घेतली होती. सदर माहीतीचे आधारे वर नमुद आरोपी यातील तक्रारदार यांना सदर हॉटेल परवाना हा नियमानुसार मिळाला नसून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. सदर बाबत मी उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठांकडे तक्रारी करुन तुझा हॉटेल परवाना रदद करतो. अशी धमकी देत होता . त्यासाठी तो तक्रारदास यास वारंवार फोन करुन, समक्ष भेटून तिन लाख रुपये खंडणीची मागणी करत होता. सदर आरोपीविरुध्द नगर शहरात अनेक गुन्हे दाखल असल्याने यातील तक्रारदार हे घाबरुन गेले होते. परंतु त्यांची खंडणी देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय येथे येऊन पोलीस निरीक्षक स्था.गु.शा यांची भेट घेऊन त्यांचेकडे तक्रारी अर्ज दिला . लागलीच सदरबाबतची माहीती पो नि दिलीप पवार यांनी वरिष्ठांना दिली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह यांनी 
अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील व संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा पो. नि दिलीप पवार यांना अर्जावर कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि सोळके , पोउनि मेढे, पोहेकॉ रविंद्र पांडे , पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे पोना रविद्र कर्डीले, पोकॉ संदिप दरंदले, कमलेश पाथरुट, रोहीत मिसाळ असे तक्रारदार व सोबत सरकारी दोन पंच यांना बोलावून घेवून तक्रारदार यास एक लाख रुपये रक्कम सोबत घेण्यास सांगून ठरलेल्या ठिकाणी जाऊन पंचासमक्ष तक्रारदार व पोलीस पथकाने सापळा रचून खंडणी मागणारा इसम याची वेषांतर करुन वेगवेगळया ठिकाणी वाट पाहत थांबलो. काही वेळात तेथे ठरलेल्या संभाषणाप्रमाणे खंडणी मागणारा दिगंबर लक्ष्मण गेंटयाल हा आला. त्याने तक्रारदार यास खंडणीची मागणी करुन रक्कम एक लाख रुपये स्वीकारल्यानंतर सापळयातील पंचासमक्ष पोलीस पथकाने त्यास झडप घालुन त्यास जागीच ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातील एक लाख रुपये रक्कम हस्तगत केली. तक्रारदार यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. पुढील कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत.

आरोपी दिगंबर लक्ष्मण गेंटयाल याचेवर दाखल असलेले गंभीर गुन्हे याप्रमाणे
१ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं १८२/२०१५ भा.द.वि.क .३०७,३ ९ ५ प्रमाणे 
२ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं १८०/२०१५ भा.द.वि.क .४३८,३५३ प्रमाणे 
३ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं 1८०/२०१६ मुंबई पो.अॅक्ट ३७ ( १ ) ३ , १३५ प्रमाणे
४ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं ११ ९ ७ / २०१५ डिफेसमेंट अॅक्ट क ३५ प्रमाणे ५ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं 1 ३ ९ ० / २०१७ भा.द.वि.क. ३ ९ २,३२७ ३४१ प्रमाणे 
६ ) तोफखाना पोस्टे गु.रजि नं 1३ ९ ० / २०१६ आर्म अॅक्ट ३,२५ प्रमाणे 
७ ) कोतवाली पोस्टे गु.रजि नं 1 ११७/२०२० महा पो.का.क. ३७ ( १ ) ३ १३५ प्रमाणे अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की , अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीचे इसम कोणत्याही कारणासाठी खंडणी / वर्गणी मागत असतील किंवा इतर प्रकारचा त्रास देत असतील तर तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
कारवाई पोलीस अधीक्षकअखीलेश कुमार सिंह , अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील व नगर शहर
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे . 

Post a Comment

0 Comments