Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

१२ तासाच्या आत सोलापूर येथील १४ जण जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९- केडगाव शिवारात दहशत घालून दरोडा टाकणाऱ्या गुंडाच्या टोळीचा पाठलाग करुन ४७ लाखाच्या मुद्देमालासह १२ तासाच्या आत केले जेरबंद केले आहे. कोतवाली पोलिसांची ही कारवाई केली आहे.
प्रदीप प्रकाश शिंदे (रा.मेडसिंगी, ता.सांगोला,जि.सोलापूर), जगदीश बाळासाहेब शिंदे (रा.मेडसिंगी, ता.सांगोला,जि.सोलापूर), लखन धनाजी कांबळे (रा.अकोला ता.सांगोला जि.सोलापूर), दीपक दगडू शिंदे (रा.अकोला ता.सांगोला, जि.सोलापूर), अजित धोंडीराम मिसाळ रा.चिनके, ता.सांगोला जि.सोलापूर), नवनाथ मुरलीधर खरकाळे (रा.अकोला, ता.सांगोला जि.सोलापूर), सागर बाळू सरगर (रा.मेडसिंगी ता.सांगोला, जि.सोलापूर), निखिल लहू वाळके (रा.मेडसिंगी ता.सांगोला जि.सोलापूर), नवनाथ रमेश पाटील (रा.ओलेगाव ता.सांगोला जि.सोलापूर), मनोहर शिवाजी सरपळे (रा.आंधळगाव, ता.मंगळवेढा, जि.सोलापूर), हनुमंत मारुती गावडे (रा.वारेगाव, ता.सांगोला, जि.सोलापूर), अजय सिताराम भोसले (रा.वारेगाव ता.सांगोला, जि.सोलापूर), सौरभ सुखदेव मोरे (रा.आंधळगाव ता.मंगळवेढा जि.सोलापूर), प्रदीप बाळासाहेब शिंदे (रा.मेडसिंगी ता.सांगोला जि.सोलापूर) आदि १४ जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, केडगावच्या एक्स पार्किंग यार्ड रविवारी (दि.२८) पहाटे ५.४५ वा.च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची विना नंबरची स्विफ्ट डिझायर कार, विना नंबरची पांढऱ्या रंगाची एर्टीका कारमधून सौरभ मोरे व त्याच्या सोबत १२ ते १५ अनोळखी इसम हातात लाकडी दांडके, लोंखडी राँड घेऊन आले आहेत. पार्किंगच्या छोट्या गेटवर चढून अनिधिकतपणे आत प्रवेश करून गेटवरील वाचमन सुधाकर पाटील यास मारहाण करून त्याच्या ताब्यात असणारी मोठ्या गेटची चावी बळजबरीने हिसकावून घेतली. गेट उघडून आत असणारा दुसरा वाचमन संजय पगारे व अभिषेक गोंडाळा यांना तसेच सुनील गोंडाळा यांना लाकडी दांडके, लोखंडी राँडने मारहाण केली. दाख दाखवून त्याच्या ताब्यातील ट्रक टाटा (एमएच ४५, ए एफ ३००६) व तीन मोबाइल फोन बळजबरीने चोरी करून नेले, अशी फिर्याद सुनील विठ्ठल गोंडाळा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात केली होती. या फिर्यादीवरुन गु.र.नं ४५७८/२०२० भादवि कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदरील दाखल गुन्ह्याबाबत कोतवालीचे पो.नि.प्रविण लोखंडे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील सर्व चेकपोस्ट व पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथे माहिती देऊन नाकाबंदी लावण्यात आली. या तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पुण्याच्या दिशेने तपास पथके रवाना केली. केडगाव चौफुल, पुणे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सुपा दूरक्षेत्राचे पोकाँ नगरे आणि कोतवालीचे पोसई सतिष शिरसाठ व गुन्हे शाखेचे पथक यांनी १२ टायर ट्रक (एमएच ४५, एएफ ३००६) ही थांबवून चालकाला खाली उतरून ताब्यात घेतले. पुढे असणारी स्विफ्ट कार या गाड्या अडवून त्यामधील १४ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या गाड्याची झडती घेतली असता, लाकडी दांडके, लोंखडी राँड,पाईप, दगडाची गोफण व १४ मोबाईल असा एकूण ४७ लाख ७० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकारणाचा पुढील तपास सपोनि रणदिवे हे करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पो.नि.प्रविण लोंखडे, गुन्हे शाखेचे प्रमुख पोसई सतिष शिरसाठ, पोना गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोकाँ सुजय हिवाळे, भारत इंगळे, बापूसाहेब गोरे, लहाणे, प्रशांत राठोड, पुणे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सुपा दूरक्षेत्राचे पोकाँ नगरे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments