Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठवाडा केसरी वृत्तसमूहाचे संपादक छबुराव ताके यांच्या हस्ते शिवाजीनगर येथे कालिका क्लिनिकचे उदघाटनआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
औरंगाबाद :-औरंगाबाद येथील शिवाजीनगर  बस स्टॉप समोरील शिवाजीनगर पोलीस चौकीजवळील ढोले यांच्या इमारतीमध्ये नव्याने सुरु झालेल्या डॉ.कपिल व डॉ . मयुरी झोटिंग यांच्या कालिका क्लिनिकचे उदघाटन नुकतेच  दैनिक मराठवाडा केसरी वृत्तसमूहाचे मुख्य संपादक छबुराव ताके यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित   करण्यात आले .यावेळी उपस्थितांनी कोव्हीड १९ च्या नियमावलीचे पालन केले होते.
डॉ.कपिल झोटिंग व डॉ. मयुरी झोटिंग यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा परिसरातील येणाऱ्या रुग्णांना अल्पदरात करून रुग्णाची सेवा करावी,परिसरातील नागरिकांसाठी वेगवेगळी आजाराची शिबीर घेऊन अल्पदरात योग्य सेवा द्यावी,रुग्ण व आपल्यात व्यावसायासंदर्भात फॅमिली व विश्वासाचे नातं निर्माण करावे .वैद्यकीय सेवेला व्यवसायाचे स्वरूप न देता रुग्ण सेवा हीच ईशवर सेवा समजून कालिका क्लिनिकचे डॉ .झोटिंग व डॉ. मयुरी झोटिंग हे परिसरात काम करतील अशी अपेक्षा संपादक ताके यांनी व्यक्त केली. यावेळी एसटी महामंडळचे पवार .मराठवाडा केसरीचे निवासी संपादक अशोक झोटिंग ,भास्कर निकाळजे ,डॉ.सुरेश कासार (मालेगाव ) गणेश कासार (नंदुरबार ) काकासाहेब झोटिंग ,इंजिनियर योगेश झोटिंग ,शुभम झोटिंग ,संजय ढोले ,सुमित ढोल, रवी पोफळे ,विलास दहिभाते ,नितीन झोटिंग, वसीम शेख, सौ.शोभाताई झोटिंग ,सौ ,भाग्यश्री झोटिंग,सौ.भारती झोटिंग, सौ.कल्पना कासार, सौ.सरला कासार आदी उपस्थितीत होते. शेवटी डॉ.कपिल झोटिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले .


Post a Comment

0 Comments