Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस कर्मचारीच वरिष्ठांवर शिरजोर!

कोतवाली पोलीस निरीक्षकासह डिबी इन्चार्जवर राजकीय दबावतंत्र ; वसुलीसाठीच अपवाद पोलीस कर्मचाऱ्याचे धक्कातंत्र
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.२७- कोतवाली पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच हजर झालेले पोलीस निरीक्षक व डिबी इन्चार्जवर राजकीय दबाव वाढत असल्याने दोन्ही पोलीस अधिकारी त्रस्त झाले आहेत. हे केवळ वसुली मिळण्यासाठी अंतर्गत वादात अपवाद कर्मचारी राजकीय दबावतंत्र वापर करीत आहे, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे. 

'एसपी' साहेब अशीच परिस्थिती राहिल्यास वरिष्ठांचा गुन्हेगारांसह अवैध धंद्यावाल्याना पोलिसांची भिती राहणार नाही. हे सर्व केवळ 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांतील अंतर्गत 'वसुली'च्या कारणांमुळे घडत आहे. यात कोतवाली पोलीस ठाण्यात अपवाद पोलिसांनी आपलीच मक्तेदारी असल्यासारखे ठाण्यातील वरिष्ठांना राजकीयांना हाताशी धरून अप्रत्यक्ष त्रास देण्याच्या कुरघोड्या सुरू केल्या आहेत.
यामुळेच सध्यातरी कोतवाली डिबीपासून ते सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात आपलीच मक्तेदारी असल्यासारख्या वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बारकाईने लक्ष केंद्रित केल्यास अनेक बेकायदेशीर प्रकार उघडकीस येऊ शकतात. 
नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कोतवाली ठाणे आहे. यामुळे सर्वच अवैधधंद्यावाल्यासह गुन्हेगारावर वचक राहणे आवश्यक आहे. यासाठीच यापूर्वी तत्कालीन एसपी कष्णप्रकाश, विश्वास नागरे पा. यांनी कोतवाली पोलीस ठाण्यावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु कोतवाली पोलीस ठाण्यात सध्याची परिस्थिती वेगळी आहे. हे केवळ एसपीचे लक्ष नसल्याकारणाने आहे. यामुळे एसपी साहेब यांनी कोतवाली पोलीस निरीक्षक व डिबी ईन्चार्ज यांना ताकद दिली पाहिजे, तसेच राजकीय वरदहस्त ठेवून वरिष्ठांना अप्रत्यक्ष त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे आवश्यक आहे. पण तसे होत नसल्याने मक्तेदारी समजणारे 'त्या' कोतवाली पोलीसांचा दिवसेंदिवस नवीन आलेल्या पोलीस निरीक्षक व डिबी ईन्चार्ज यांना अप्रत्यक्ष त्रास देण्याचे फंडे सुरु झाले आहेत. या कोतवालीतील अंतर्गत वादाचा परिणाम कोतवालीच्या कामकाजावर होत आहे. यात कोतवालीत आपलीच मक्तेदारी समजणाऱ्याचा अनेक अवैध धंद्यावाल्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध वाढले आहेत. याचा सर्वच कारवाईवर परिणाम झाला आहे. यामुळे एसपी साहेब आपण कोतवालीच्या कामकाजाची गोपनीय माहिती घेतल्यास अनेक घडामोडी उजेडात आल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही सर्व वस्तुस्थिती समजावून घेण्यासाठी 'एसपी' साहेब किती अनुकूल आहेत, यावर अवलंबून आहे. 
या गंभीर घडामोडींची 'एसपी' साहेब यांनी दखल न घेतल्यास, सर्व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर कंट्रोल राहणार नाही. याचा परिणाम पोलीस प्रशासनावर होईल, हे सर्व टाळण्यासाठी 'पोलीस ठाण्यात आपलीच मक्तेदारी' असे समजाऱ्या 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांवर बदल्याची कार्यवाही होणे क्रमप्राप्तच आहे. यामुळे 'एसपी' काय निर्णय घेतात याकडे सर्व जिल्ह्यातील पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments