Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आ.पडळकर यांचा नगर शहर राष्ट्रवादीतर्फे निषेध

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२४ -पदमविभूषण खा. शरदचंद्रजी पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा शहर राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, विद्यार्थी शहरजिल्हाक्ष वैभव ढाकणे , सुमित कुलकर्णी , जॉय लोखंडे ,गजानन भांडवलकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की आदरनीय शरदचंद्रजी पवार हे देशाचे आदरणीय व्यक्तिमत्व आहे देशावर राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी सक्षमपणे भूमिका मांडून संकटातून बाहेर काढण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. भाजप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा पावसाहेबांची त्यांनी केलेल्या विविध कामाबद्दल देशातील जनते समोर स्तुती केलेली आहे.
अखंड 50 वर्षे त्यांचे देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये योगदान दिले.
आ गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हवेसे पोटी बेताल वक्तव्य करून आपला मूर्खपणा जनतेसमोर उघड केला.

पवार साहेबांनी कधीच जातीपातीचे राजकारण न करता सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं आहे . भाजप पक्षाने आशा लोकांना समज देण्याची गरज आहे , शरदचंद्रजी पवार हे आजच्या पिढीला एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी देशाचे जानतेराजे शरदचंद्रजी पवार  यांची जाहीर माफी मागावी.
शहरातील कोठी येथे शरदचंद्रजी पवार यांच्या बद्दल वक्तव्य करणाऱ्या आ.पडळकारांच्या फलकाला जोडे मारून निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने कोठी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या बद्दल खालच्या पातळीची टीका केल्या बद्दल प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला .
त्यावेळी अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष जॉय लोखंडे,विद्यार्थी अध्यक्ष वैभव ढाकणे , आकाश पंचमुख , अक्षय डाके , रोनक लोंढे , केनित कलसेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments