Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकी चोरी करणारा जेरबंद ; भिंगार कँम्प - कोतवालीची संयुक्त कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२३- अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरणाऱ्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. लहू शिवारी काळे (वय१९,रा.अमरधामसमोर,बाजारतळाशेजारी, अ.नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. भिंगार कँम्प व कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर शहरातील सारसनगर परिसरातून लहू काळे याला पोलिसांनी अटक केली. पोलीस खाक्या दाखवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. स्पेलडर (एमएच१७,एक्यू ७५०८), ड्रिमयुग (एमएच १४, डिडब्ल्यू ४४३२) व अँव्हेटर मोपोड (एमएच १६, सीएम ३७९४) अश्या तीन दुचाकी त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या असून, भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पो.नि.प्रविण लोंखडे व भिंगार कँम्पचे प्रभारी अधिकारी प्रविण पाटील यांच्या सूचनेनुसार कोतवालीचे सपोनि पवार, पोसई सतिष शिरसाठ, पोकाँ हिवाळे, सफौ राजेंद्र मुळे, राजेंद्र गायकवाड, पोहेकाँ संतोष पानसरे, अजय नगरे, गणेश नागरगोजे, पोना भानुदास खेडकर, राजेंद्र सुद्रीक, राहुल द्वारके आदीच्या पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

0 Comments