Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जामखेड ग्रामीण रुग्णालयाची नातेवाईकांनी केली तोडफोड ; ५ जणांवर गुन्हा दाखलआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड दि.२३- खर्डा येथील उच्च शिक्षित युवक सुजित अनिल चव्हाण (वय २४ रा. खर्डा) याने राहत्या घरी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली यानंतर त्याला उपचारासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र टाकसाळ यांनी सदर युुवक मयत झाला आहे असे साांगताच नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करून दवाााखान्याची तोडफोड केली याप्ररकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जामखेड पोलिसात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी डॉ. रवींद्र नारायणराव टाकसाळ यांनी फिर्याद दिली की, सोमवारी दवाखान्यात पेशंट तपासणी करीत असताना सकाळी साडेअकरा वाजता काही लोक स्ट्रेचर वर बॉडी घेऊन आले व त्यांनी पेशंटला तात्काळ तपासा त्याने फासी घेतली आहे असे सांगितले सदर पेशंटची तपासणी केली असता तो मयत झाला आहे असे सांगितले व नाव विचारले असता त्यांनी सुजीत अनिल चव्हाण असे सांगितले.
याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ युवराज खराडे यांना मोबाइलवरून माहिती दिली त्यांनी सदर मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी पोस्ट मार्टम रूमकडे मयताचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी सांगितले दरम्यानच्या काळात मयताच्या नातेवाईक सुरज विलास पवार, सागर धुलचंद पवार, अभिजित अनिल पवार, निवृत्ती गोरख चव्हाण, निरज वसंत कसबे व इतर तीन लोक यांनी दवाखान्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 
सदर लोकांना गोंधळ का घालता असे विचारले असता त्यांनी शिविगाळ दमदाटी करून धक्काबुक्की केली तसेच तोंडावर चापट मारून डॉ. खराडे कोठे आहे अशी विचारणा करून ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी रूम, वैद्यकीय अधिकारी रूम, इंजेक्शन रूम, स्टाफ रूम, औषधाची रूम या रूमचे दरवाजा व काचा फोडल्या. दवाखान्यात पेशंटसाठी बसवलेले सॅनिटायझर मशिन फोडून अंदाजे सात हजार रुपयांची नुकसान केले
वैद्यकीय अधिक्षक डॉ. युवराज खराडे दवाखान्यात आले असता त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली याबाबत जामखेड पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यांनी तात्काळ परिस्थिती आटोक्यात आणली 
मयत सुजित अनिल चव्हाण यांच्यावर डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला रात्री उशिरा खर्डा येथे मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर जामखेड पोलिसात वरील आरोपी विरूद्ध तक्रार दिली पोलीसांनी वरील पाच व अज्ञात दोन जणांवर सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेची नुकसान शिवीगाळ व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

0 Comments