Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री साईबाबा समाधी मंदिरात सूर्यग्रहण कालावधीत साईबाबांना सफेद शाल व रुद्राक्षाची माळ अर्पण


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी दि.२१- रविवारी (आज) सूर्यग्रहण असल्याकारणाने शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरातील नित्यनियमाच्या पूजाअर्चा, आरती,याधर्मिक कार्यक्रमात बदल करण्यात आला होता. सकाळी सूर्यग्रहणाच्या कालावधीपासून म्हणजे सकाळी दहा वाजेपासून श्री साई समाधी मंदिरात मंत्रोपचार करण्यात येत होते. तसेच दुपारची मध्यान आरती बाराएेवजी व ती सूर्यग्रहण संपल्यानंतर दुपारी अडीच वाजता पुजाऱ्यांनी मंदिरात केली. सूर्यग्रहणाच्या कालावधीत बाबांना सफेद शाल व रुद्राक्षाची माळ अर्पण करण्यात आली होती. तसेच समाधीवर दुर्वांकुर व तुळशीपत्र ठेवण्यात आले होते.
आज रविवार 21 जून रोजी सूर्यग्रहण असल्याने देशातील सर्वच मंदिरे दर्शनासाठी या सूर्यग्रहण कालावधीत आज बंद होती. शिर्डीतील साईबाबा मंदिर कोरोणाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी यापूर्वीच साईभक्तांसाठी दर्शनाला बंद आहे. मात्र येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने पुजारी श्री साई समाधी मंदिरात नित्यनेमाने पूजा,अर्चा ,आरती करतात, मात्र आज 21 जून रविवारी सूर्यग्रहण असल्या कारणाने नेहमीच्या नित्यपूजा कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला होता.आज सूर्य ग्रहण असल्याने या सूर्यग्रहण काळात सकाळी दहा वाजेपासून सूर्यग्रहण संपेपर्यंत श्री साई समाधी मंदिरात श्री साईबाबांना सफेद शाल, अर्पण करण्यात येऊन रुद्राक्षाची माळ घालण्यात आली होती .तसेच श्री साईबाबांच्या समाधीवर सूर्यग्रहणाचा कोणताही प्रभाव होऊ नये,म्हणून दुर्वांकुर व तुळशीपत्र ठेवण्यात आले होते. तसेच या सूर्यग्रहण कालावधीत सतत धार बाबांच्या समाधीवर सुरू ठेवण्यात आली होती .त्याच प्रमाणे श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री साईबाबांच्या समोर पुजाऱ्यांकडून श्री रुद्रावतरण मंत्र, नवग्रह मंत्र, विष्णुसहस्रनामजप, श्री साई स्तवन मंजिरी , शांतशुद्धी पठण यांचे वाचन व मंत्रोपचार साडेतीन ते चार तास अखंडपणे मंदिरात करण्यात येत होता, शिर्डी मध्ये सूर्यग्रहणाचा कालावधी सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत असल्याने या सर्व कालावधीत श्री साई समाधी मंदिरात पुजाऱ्यांकडून मंत्राचे पठण सुरू होते.हे सूर्यग्रहण संपल्यानंतर श्री साईबाबांना मंगलस्नान घालण्यात आले. व त्यानंतर शिर्डी माझे पंढरपुर ही आरती करण्यात आली. त्यानंतर सूर्यग्रहणामध्ये दुपारी बाराची मध्यान आरती न करता सूर्यग्रहण संपल्यानंतर दुपारी अडीच वाजता मध्यान आरती श्री साई बाबांच्या मंदिरात करण्यात आली, दर सूर्यग्रहण व चंद्रग्रहण ज्या कालावधीत असते त्या कालावधीत मंदिरात मंत्रोपचार करण्यात येत असतो. भाविकांना दर्शनासाठी मंदीर बंद करण्यात येत असते, कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी श्री साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून बंद करण्यात आले आहे व आजही श्री साईबाबा मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंदच आहे. आज सूर्यग्रहण असल्यामुळे येथे या सूर्यग्रहण कालावधीत मंत्रोपचार करण्यात येवुन या सूर्यग्रहणाचा प्रभाव येथे पडू नये.म्हणून विविध मंत्रोच्चार तसेच श्री दुर्वांकुर व तुळशीपत्र यांचे समाधीवर अर्पण करण्यात आले होते. सूर्यग्रहणा मुळे शिर्डी व परिसरातही घराघरात अनेकांनी श्री साई स्तवन मंजिरी वाचून घरीच पूजाअर्चा करत श्री साईबाबांची ध्यानधारणा केली.

Post a Comment

0 Comments