Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर एमआयडीसी येथे बडतर्फ सैनिक जेरबंद ; मिलेट्री इंटेलिजन्स व एलसीबीची संयुक्त कारवाई

आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२०- भारतीय सैन्य दलातून बडतर्फ असतानाही सैन्य दलाचा युनिफॉर्म, बनावट ओळखपत्र व चिन्ह वापरून फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी पकडण्यात आले. प्रशांत भाऊराव पाटील (वय३२, रा.रवळनाथरोड, कुकतागिरी, खानापूर, बेळगाव राज्य कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई मिलेट्री इंटेलिजन्स व एलसीबीची संयुक्त पथकाने केली. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर एमआयडीसी येथे दत्तनगर, डेअरी चौक, पाण्याच्या टाकीजवळ किशोर लांडगे रौ-हौसिंग येथे राहात असणारा तो सैन्य दलात नोकरीत नसताना, सैन्य दलाचा युनिफॉर्म घालून बलेनो गाडी (एमएच १०, सीएक्स ६९७५) या गाडीवर 'आँन आर्मी ड्युटी' असा बोर्ड लावून संशयितरित्या फिरत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह यांना मिलेट्री इंटेलिजन्स, जम्मू काश्मीर युनिट यांच्याकडून खात्रीपूर्वक माहिती मिळाली. यानंतर आर्मी व पोलीस दलाच्या पथकाने त्या संशयितास पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली, यात त्याने प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२, रा.रवळनाथरोड, कुकतागिरी, खानापूर, बेळगाव राज्य कर्नाटक) नाव सांगितले. तत्पूर्वी त्याने दोन्ही दलाच्या अधिकाऱ्यांना उडावाउडवीची उत्तरे दिली. यावेळी संशय वाढल्याने त्याची, घराची व गाडीची झडती पंचासमक्ष घेण्यात आली. या दरम्यान, आर्मीचे बनावट ओळखपत्र, चिन्ह, फित, गोल शिक्का, स्टँम्प पँड, नेम प्लेट, आर्मीचे कँन्टींग कार्ड, वडील व पत्नी च्या नावाचे डिपेन्डींग कार्ड, ५ वेगवेगळ्या बँकेचे एटीएम, पेन्शन सिस्टीम कार्ड, पँन कार्ड, आधारकार्ड, आर्मीचे नोकरीसाठी लोकांकडून भरून घेण्यात आलेले फार्म, वेगवेगळ्या बँकेचे स्वतः चे व पत्नीच्या नावाचे १४ बँक पासबूक, ७ बँकेचे चेकबुक, २ आर्मी मेजर रँक अधिकारी ड्रेस, ३ आर्मी साधे ड्रेस, मारुती सुझुकी कंपनीची बलोनो कार, तिच्या दोन्ही नंबर प्लेटवर बनावट (एमएच १०, सीएक्स ६९७५) असा नंबर, समोरील काचेवर 'आँन आर्मी ड्युटी' असख बोर्ड, गाडी मागील आर्मी चिन्ह असणारी नंबर प्लेट, केए २२, एबीए ११३९ या नंबरच्या प्लेट, वेगवेगळ्या कंपनीचे ५ मोबाइल, आसाम रायफल ट्रेनिंग सेंटर स्कूल यांचेकडील मेजर ए. के.नायर यांच्या सहीचे परसराम भाऊराव पाटील या नावाचे प्रोव्हिजनल अपाँईटमेंट लेटर, ४६ आसाम रायफल रेंजीमेंट यांची गैरहजर बाबतीत कारणे दाखवा नोटीस असा एकूण ७ लाख २२ हजार रु. मुद्देमाल व बनावट कागदपत्रे व ओळखपत्रे मिळून आली. हे सर्व पंचासमक्ष जप्त करण्यात आले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोना संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२, रा.रवळनाथरोड, कुकतागिरी, खानापूर, बेळगाव राज्य कर्नाटक) यांच्याविरुद्ध फसवणुकीसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले.
आरोपी पाटीलवर यापूर्वी पुणे येथील बंडगार्डन व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.नि. दिलीप पवार व त्यांच्या पथकातील सफौ नानेकर, पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डीले, आण्णा पवार, विजय ठोंबरे, विश्वास बेरड, दिनेश मोरे, पोकाँ योगेश सातपुते, मयूर गायकवाड, एमआयडीसीचे सपोनि मोहन बोरसे, सदर्न कंमाड लायझन युनिट,अहमदनगर येथील कर्मचाऱ्यांनी ही महत्त्वाची कारवाई केली.

Post a Comment

0 Comments