Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एडीसी बँकेत इंटरनेटवेग संथ असल्याने शेतकरी त्रस्त ; सर्वच शाखेत ही परिस्थिती! संचालक मंडळाचे दुर्लक्ष


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१६- अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेच्या सर्वच शाखेत इंटरनेट वेग संथ आहे. याचा बँकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने बँक कर्मचाऱ्यांसह शेतकरी त्रस्त झाले आहे. यामुळे मुख्य जिल्हा सहकारी बँकेच्या संथ गतीने व्यवहारावर परिणाम होत आहे. जिल्हा सहकारी बँक संचालकांचे याकडे दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाखेत वारंवार या घटना घडत असल्याने बँकेचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेच्या सर्वच शाखेत शेतकरी पैसे काढण्यासाठी अथवा जमा करण्यासाठी बँकेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. हे केवळ बँकेचा कारभार इंटरनेटवर संथ गतीने होत असल्याने होत आहे. याचा त्रास बँक कर्मचाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांना होत आहे. याबाबत बँकेच्या वरिष्ठांनी लक्ष घालून इंटरनेटच्या संथगतीने सुरू असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानात बदल करुन नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यातून बँकेतील सर्व शाखेतील यंत्रणेला वेग येऊन बँक कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांची कामे वेळे मार्गी लागतील. या सर्व बँकेच्या घडामोडी सुरळीत होण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने शेतकरी हितासाठी लक्ष केंद्रित करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments