Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी सैनिक खून प्रकरणी दोषींवर शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या मागणीनंतर खुनाचा गुन्हा दाखल


केस फास्टट्रॅक कोर्टात 
चालवावी - शंभुसेना, माजी सैनिक आघाडी

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : दि. ८ जूनला सायंकाळी ६.३० वाजता सोयरीकीच्या किरकोळ वादातूून दगड, काठ्या व लोखंडी रॉडच्या साहाय्याने माजी सैनिक कै. मनोज औटी यांचा ठेचून खून करणाऱ्या दोषींवर अखेर तीन दिवसांनंतर शंभुसेना संघटना, माजी सैनिक आघाडीच्या जोरदार मागणीनुसार खुनाचा कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी यासाठी सदर प्रकरणाचा न्याय निवाडा फास्टट्रॅक कोर्टात व्हावा, अशी मागणी शंभुसेना प्रमुख दिपक राजेशिर्के तसेच सैनिक आघाडीचे उपाध्यक्ष कोरके, सुनील काळे यांनी निवेदनातून केली आहे.

माजी सैनिक खून प्रकरणा बाबत दिनांक 12 जून रोजी शंभुसेना, माजी सैनिक आघाडीचे पदाधिकारी यांनी माजी सैनिकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले असता, मयत माजी सैनिकाच्या परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळण्याच्या उद्देशाने तात्काळ सूत्रे हलवली. माजी सैनिक निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी मोकाट वावरत असल्याचे दिसून आले होते. परंतु सदर घटना शंभुसेना प्रमुख, माजी सैनिक श्री. दिपक राजेशिर्के, सैनिक आघाडीचे उपाध्यक्ष राम कोरके, माजी सैनिक श्री. सुनिल काळे मा. अध्यक्ष पुणे जिल्हा माजी सैनिक आघाडी यांच्या लक्षात येताच, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या हेतूने, आरोपींच्या विरोधात, कठोर कारवाई होण्यासाठी जेष्ठ समाजसेवक, पदमभूषण मा. आण्णा हजारे, नगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, नगर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिह, सुपा पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले आदींच्या भेटी-गाठीसह सविस्तर निवेदने देण्यात आली.
प्रशासन योग्य कारवाई करण्यास कचुराई करत असल्याचे लक्षात येताच, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री मा.अनिल देशमुख साहेब, सैनिक कल्याण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांच्या बरोबर सविस्तर पणे चर्चा करत सदर केसचा कसून पाठपुरावा केल्याने अखेर आरोपींवर सुपा पोलीस ठाण्यात कलम ३०२ च्या कायदे अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई नंतर लागलीच पारनेर कोर्ट मार्फत २ आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन १५ दिवसांच्या रिमांडवर पाठविण्यात आले आहे. बाकीचे चार आरोपी फरार आहेत, त्यांचाही सुगावा पोलिसांना लागला असून पोलिसांचे पथक वेग वेगळ्या दिशेला पाठवले आहेत व लवकरच त्यांना देखील कलम ३०२ कायद्या अंतर्गत ताब्यात घेतले जाईल असी माहिती सुपा पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र भोसले यांनी शंभुसेना प्रमुख दिपक राजेशिर्के व माजी सैनिक आघाडीचे सुनिल काळे यांना दिली.
माजी सैनिक खून प्रकारणाबाबत सविस्तर चर्चा जेष्ठ समाजसेवक, पदमभूषण मा. श्री. आण्णा हजारे यांच्या बरोबर करून विशेष लक्ष घालण्याची विनंती केली असून आण्णांनी तात्काळ सकारात्मक पाऊल उचलत, मी तुमच्या बरोबर असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments