Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सत्ताधारी नेत्याने फरकातील रक्कम कर्मचाऱ्यांकडून उकळली नाही हे शपथपूर्वक सांगावे : आर.पी. राहाणे

आरोप प्रत्यारोपाने बँकेचे वातावरण तापले. घड्याळ खरेदी व कर्मचारी फरकाचा मुद्दा ऐरणीवर
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत मोठया प्रमाणात घोटाळ्यांची मालिका सुरू झाली असून ३१ मार्चपुर्वी पडद्यामागे सभासदांच्या व कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैश्यावर हात मारण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे.हे जर मान्य नसेल तर सत्ताधारी नेत्याने फरकातील रक्कम कर्मचाऱ्यांकडून उकळली नाही हे शपथपूर्वक सांगावे. 

गेल्या ४ वर्षापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी मोठ्या विश्वासाने सत्ता गुरुमाऊली मंडळाच्या ताब्यात दिली.परंतु रावसाहेब रोहोकले यांच्या नंतर जे व्हायचे तेच झाले.पारदर्शी कारभाराच्या नावाखाली रावसाहेब रोहोकले यांच्या नंतर फक्त माया गोळा करण्याचा उद्योग सत्ताधारी हुकूमशाही नेत्याच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. असा घणाघाती टोला परिषद व गुरुमाऊली मंडळाचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आर.पी.रहाणे यांनी लगावला आहे.
सातत्याने जिल्ह्यातील लबाड आणि बोल घेवड्या मंडळींना बरोबर घेऊन आणि त्यांच्याच सल्ल्याने स्वकीयांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणा-यांचे चेहरे आता उघडे पडले असून त्यांची आता रावसाहेब रोहोकले यांचे नाव घेण्याची तरी लायकी राहीली आहे का ? याचे सत्ताधा-यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. शताब्दी महोत्सवा अंतर्गत तरतूद करून ठेवलेल्या रक्कमेतून खरेदी केलेल्या घड्याळ खरेदीतील भ्रष्टाचारा बरोबरच देश व राज्य कोरोना विरुध्द लढा देत असताना सत्ताधारी मात्र याच काळात बँकेचे तत्कालिन मुख्य. कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगामधील अर्ध्या फरकाच्या रक्कमा जमा करण्यात मश्गूल होते.३१ मार्चपुर्वीच जिल्हयातील १३ शाखांतील सर्व शाखाधिकाऱ्यांना तोंडी आदेश देऊन सर्व कर्मचाऱ्यांकडून जवळजवळ ५१ लाख रुपये जमा करण्यात आले .अनेक कर्मचा-यांनी लॉकडाऊन काळात कर्ज व उसनवारीने रक्कमा जमवून संबंधित शाखाप्रमुखांकडे जमा केल्या नंतर त्यांच्याकडून ह्या रक्कमा हेड अॉफिसकडे जमा केल्या.
वास्तविक सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम कर्मचा-यांच्या नावे जमा करण्या आगोदरच अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसुल करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी हा सेवानिवृत्तीनंतर जीवन जगण्यासाठी साठविलेली पूंजी असते परंतू भाविष्य निर्वाह निधीत जमा होणारी सातव्या वेतन आयोगाची निम्मी रक्कम देखील कर्मचाऱ्यांकडून हडप करण्यात आली हे काम इमानेइतबारे केल्यामुळेच तत्कालिन मुख्य कार्यकारी यांना सेवानिवृत्ती नियत असताना सुद्धा मुदतवाढ देऊन त्यांचे उत्तराई होण्याच्या विचारात सत्ताधारी हुकूमशाही नेता होता. परंतु काही प्रामाणिक संचालकांच्या प्रखर विरोधामुळेच या हुकूमशाही नेत्याचा डाव उधळला गेला व इमाने इतबारे आपल्याच कर्मचाऱ्यांकडून अनैतिकतेने लाखो रुपये जमा करणाऱ्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुदतवाढीचा स्वप्नभंग झाला असा गंभीर आरोप रहाणे यांनी करत या सर्व घोटाळ्यांच्या चौकशीची रीतसर मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे करणार आहोत. या एकाच आर्थिक वर्षात सभासद व कर्मचारी यांच्या जवळ जवळ ८६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार घड्याळ व कर्मचारी घोटाळ्यात सत्ताधा-यांनी केलेला आहे.याबाबतचे पुरावे आमच्याकडे असून योग्य वेळी ते प्रसारमाध्यमामधून सभासदांसमोर आणणार आहोत.
याबाबत अनेक कर्मचा-यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दूरध्वनीवरून खाजगीत खंत व्यक्त केली आहे असे आर पी रहाणे , सरचिटणीस बाळासाहेब शेळके, गणपत सहाणे, तान्हाजी वाडेकर, संतोष भोर, बाबूराव कदम, राजेंद्र भांगरे, केंद्रप्रमुख परिषदेचे जिल्हाध्यक्ष अशोक ढगे,  विकास मंडळाचे विश्वस्त भाऊसाहेब ढोकरे, गोरक्षनाथ देशमुख, रमेश धोंगडे,मच्छिंद्र ढोकरे,शिक्षक परिषद उत्तर जिल्हाप्रमुख भीमराज उगलमुगले, गुरुमाऊली मंडळाचे अकोले तालुकाध्यक्ष सुदाम धिंदळे,शिक्षक परिषद संगमनेर तालुकाध्यक्ष सोमनाथ घुले,शिक्षक परिषद अकोले तालुकाध्यक्ष भाऊसाहेब हासे, संगमनेर तालुकाध्यक्षा महिला आघाडी अनिता नेहे-गुंजाळ, अकोले तालुकाध्यक्षा महिला आघाडी रेखा कांबळे, एस डी गायकवाड, विलास वाकचौरे, संजय आंबरे, संजय भोर, शांताराम ढेरंगे, गणेश वाघ, बाळासाहेब बांबळे, अशोक शेटे, बहिरु जाधव, बाबुराव कदम, सदाशिव आरोटे, रावसाहेब शिंदे, बाळासाहेब आवारी, रविंद्र भालेराव, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब एरंडे, विलास शिरोळे, प्राजक्ता मोटे, बेबी पानसंबळ, प्रभाकर काळे, सत्यवान गडगे, बाळासाहेब मोरे, बाळू गुंजाळ, गवनाथ बोऱ्हाडे, दिगंबर वाकळे, विलास घुले, सुखदेव राजगुरू, भाऊसाहेब खांडगे, सतीश रोकडे, राजेंद्र मुसळे,भाऊसाहेब काकड, नामदेव शेंडगे, संजय पांडे, अरुण कोटकर, लहानू खर्डे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

Post a Comment

0 Comments