Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी कट्टा, जिवंत काडतुसे विक्रीकरीता बाळगणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.11 : नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद शिवारातील सोनई रोडवरील एका विटभट्टीवर गावठी कटटा व दोन जिवंत काडतुसे विक्रीकरीता बाळगणार्‍या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. दत्तात्रय चांगदेव आढाव (वय 30 रा.वळण ता.राहुरी जि.अ.नगर), संदीप बापु बर्डे (वय 30 रा.खेडले परमानंद, ता.नेवासा जि.अ.नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि.पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार स्था.गु. शाखेच्या पथकाने सापळा लावून विटपभट्टीवर दोन संशययितांना पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करुन त्याची झडती घेतली असता, गावठी कट्टा व जिवंत दोन काडतुस त्यांच्याकडे मिळून आली. गावठी कटटा कोठून आणला, याबाबत विचारले असता संदीप बर्डे याने गावठी कट्टा व जिवंत काडतुसे ही खेडले परमानंद ता.नेवासा येथे राहाणारा एका इसमाकडून घेतल्याची माहिती दिली. आरोपी यांना जप्त मुद्देमालासह सोनई पो. स्टे.ला हजर करुन पोकॉ मयुर गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकाँ मनोहर गोसावी, पोहेकॉ संदीप घोडके, पोना संतोष लोढे, पोना रविंद्र कर्डीले,पोना दिपक शिंदे, पोकॉ प्रकाश वाघ, संदीप चव्हाण, संदीप दरंदले, मयुर गायकवाड,पोकॉ सागर ससाणे, पोकॉ रणजीत जाधव,पोकॉ शिवाजी ढाकणे आदिच्या पथकाने ही कारवाई केली. 


Post a Comment

0 Comments