Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहर पोलीस ठाण्यांमध्ये लाँकडाऊनमध्ये वरिष्ठपेक्षा कलेक्टर वरचढ !

अपवाद पोलीस तथा अधिकाऱ्यांच्या मालमत्तेत वाढ ? ; एसीबीने लक्ष घातल्यास अनेक बाबी उघड होण्याची शक्यता..
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१० : ऐन लाँकडाऊनच्या काळात दारूची मोठी उलाढाल झाली. हे कोणाच्या आशिर्वादाने याची चर्चा आता सगळीकडेच रंगली आहे. यात ऐन लाँकडाऊन काळात नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची दिशाभूल करीत, दुसरीकडे थातुरमातुर कारवाया करून पोलिसांनीच दारु धंद्यात भागीदारी केली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे या काळात कोणत्या अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेत अथवा बँक खात्यात वाढ झाली, याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र सखोल गोपनीय माहिती घेतल्यास अनेक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी विश्वार्हता असणाऱ्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनातील घडामोडीवर बारकाईने लक्ष केंद्रित केल्यास अनेक बाबीसमोर येतील.
शहर हद्दीत कोतवाली, तोफखाना, भिंगार ही तीन पोलीस ठाणी येतात. परंतु लाँकडाऊनच्या काळात या तिन्ही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ड्युटीच केली ही बाब कौतुकास्पद आहे. पण ज्यांना पहिल्यापासून कलेक्टर नावाने संबोधले जाते, त्यांची मात्र, अवैध धंद्यावाल्याशी चांगली आर्थिकगटी झालेली असल्याने पोलीस ठाण्याच्या पीआय पेक्षा त्या कलेक्टरच्या आशिर्वादने ऐन लाँकडाऊनमध्ये मद्यधंद्यात मोठी उलाढाल झाल्याची मधुर चर्चा पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. यात काही पोलिसांनीच भागीदारी केली असल्याचे आश्चर्यजनक म्हटले जात असले तरी, धंद्यात चांगलाच मुनफा मिळाल्याने महागाचे मोबाइल संबंधितांनी गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे.
या काळाच जिल्हा पोलीस अधीक्षक हे नवीन आल्याने त्यांना ही साखळी समजणे अथवा समजून घेणे अवघड होते. परंतु आता तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विश्वासू कर्मचाऱ्यांच्या मदतीने माहिती घेतल्यास अनेक बाबी निर्दशनास येतील. पण यासाठीही वास्तव विश्वासू पथक असणे गरजेचे आहे. पण याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक किती गांभीर्याने घेतात, हे महत्त्वाचे आहे.
अपवाद पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची अवैधधंद्यावाल्यांशी उठबस वाढली आहे. यामुळे पोलीस यंत्रणेत अनेकांचे आर्थिक हितसंबंध वाढले असून, त्यामुळे पूर्वी पेक्षा कारवाईचे प्रमाण कमी झाले आहे.जिल्ह्यासह अहमदनगर शहरात अवैध धंद्यावर पोलीसाचा वचक कमी झाला आहे. यामुळे गंभीर परिस्थिती असून सर्वत्रच अवैध धंदे जोरात आहेत.

आता कलेक्टर होण्यासाठी चढाओढ !
नगर शहरातील पोलीस ठाण्यात दिवसेंदिवस अवैधधंद्यावाल्यावर लक्ष (वसुली) ठेवण्यासाठी असणाऱ्या (कलेक्टर) जागेची आपल्यावरच वरिष्ठांनी जबाबदारी द्यावी, यासाठी मोठी चढाओढ असते. यात पुन्हा ज्याची नियुक्ती होत नाही. त्यामुळे त्या नाराज गटाची आणि संबंधित पो.नि यांच्याजवळ असणाऱ्या गटात कोणत्यान् कोणत्या कारणाने खटके उडतात. या सर्व राजकारणाचा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठीला त्रास होतो, अखेर तो वरिष्ठ अधिकारी तेवढचं जबाबदार असतो, हे दुर्लक्षून चालणार नाही.
नगर शहरातील पोलीस ठाण्यात अपवाद पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात ४ ते ५ मोबाईल असतात. तेही ३०, ४० हजार रुपयांची महागडी. हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो.परंतु एवढ्या महागड्या वस्तू घेण्यासाठीही जिल्हा पोलीस अधीक्षकाची परवानगी घ्यावी लागते. ती या कर्मचाऱ्यांनी घेतली असावी समजू ! परंतु या मोबाईलचे काँल डिटेल्स घेतल्यास अनेक अनगोंदी कारभार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस ठाण्यामध्ये वर्षांनो वर्षे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची मनोपाली....
अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात काम करीत असल्याने अपवाद पोलीस कर्मचाऱ्यांची मनोपाली झाली आहे. त्याचे अवैध धंद्यावाल्यांशी चांगलेच आर्थिक संबंध जुंपले आहे. त्या काहींना एकाच ठिकाणी १०-१० वर्षे होऊन गेले आहेत. त्यामुळे बदल्या होणे क्रमप्राप्त असताना ही त्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. यामुळे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली न होणे मागे काय गौडबंगाल आहे. वास्तविक तीन वर्षांनी कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. पण त्या संबंधिताबाबत कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माहिती मागितली पाहिजे. नियमानुसार त्या संबंधित पोलिसांच्या बदल्या झाल्यावर त्या पोलीस ठाण्यातील मनोपाली संपून परिसरात नव्याने पोलीसाचा वचक निर्माण होण्यास मदत होईल. 

Post a Comment

0 Comments