Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साताऱ्यामध्ये 'रयत' चा अध्यक्षाच्या निवडीसाठी शरद पवार २७ जूनला


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सातारा : कोरोनाने रोखलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदाच्या निवडी आता २७ जून रोजी संस्थेचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थित साताऱ्यात होणार आहेत. त्यासाठी संस्थेची जनरल बॉडीची सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोशल डिस्टिसिंगच्या माध्यमातून होणार आहे. रयतच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
आशिया खंडात सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षासाठी निवड करण्यासाठी 27 जूनला सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची सभा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी दिली. 
रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. या निवडी आतापर्यंत कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जातात. यंदा कोरोना विषाणुच्या प्रसार रोखण्याकरीता संचारबंदी तसेच जिल्हाबंदी होती. त्यामुळे रयतचे जनरल बॉडी सदस्य सभेसाठी येऊ शकत नव्हते. तसेच सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत होती.
जनरल बॉडीचे सभासद राज्याच्या विविध भागातून येणे शक्‍य नव्हते. त्यामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता 27 जून रोजी सुरक्षीत अंतराचे नियम पाळून सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात रयत शिक्षण संस्थेची जनरल बॉडीची सभा घेतली जाणार आहे. कार्याध्यक्ष डॅ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. 
या सभेत संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदाची निवड केली जाणार आहे. त्यानंतर दोन सहसचिवांचीही निवड केली जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यात झालेला आहे. अध्यक्ष पदावर नव्याने कोणाला संधी दिली जाणार की आहे यांनाच आणखी मुदतवाढ दिली जाणार, याबाबतचा निर्णय या सभेत होणार आहे. 


 सचिव पदासाठी अनेकांची फिल्डिंग.... 
रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी कोणाची निवड होणार याकडे रयत प्रेमींसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावर्षी सचिव पदांसाठी औंध (पुणे) येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डा. शिवलिंग मेनकुदळे, धनंजयराव गाडगिळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. एस. शिवणकर, दहिवडी येथील कॉलेजचे प्राचार्य बी. टी. जाधव यांची नावे चर्चेत आहेत. यामधील कोणाचे नाव सुचविले जाणार याची चर्चा आत्तापासूनच रंगली आहे. 

Post a Comment

0 Comments