Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी ५ रुग्णांची कोरोनावर मात ; १० नवीन रुग्णांची वाढ


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि२४ : जिल्ह्यातील ०५ रुग्ण आज कोरोनावर मात करून घरी परतले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये संगमनेर येथील ०३, कर्जत आणि नगर शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. दरम्यान आज जिल्ह्यात आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली. नगर शहरातील ०८ आणि जामखेड तालुक्यातील जवळे येथील एक आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४८ झाली असून एकूण रुग्ण संख्या ३१४ इतकी झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ८० वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष आणि बावीस वर्षे युवक यांचा समावेश आहे याशिवाय नगर शहरातीलच सिद्धार्थ नगर भागातील आठ वर्षाची मुलगी, ३२ वर्षीय युवक, तीस वर्षीय महिला, २५ वर्षीय युवक यांचा अहवाल पॉझिटिव आला तसेच नालेगाव येथील वाघ गल्ली येथील बावीस वर्षीय युवकही बाधित आढळून आला आहे. हे सर्वजण यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
याशिवाय जामखेड तालुक्यातील जवळे येथील ३० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही व्यक्ती मुंबईहून प्रवास करून आली होती. तसेच संगमनेर शहरातील ५५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव आढळून आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ऍक्टिव्ह केसेस आता ४८ इतक्या झाल्या आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments