Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.पशुसंवर्धन समितीच्या सभेत विविध योजनेच्या लाभधारकांचे अर्ज मागविण्यास मान्यता


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९- जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची दि.५ जूनला तहकूब झालेली सभा सोमवारी (दि.२९) सभापती सुनिल गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभेत विविध उपाययोजनांवर चर्चाअंती ८ सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वसाधारण, आदिवासी उपाययोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना, अनुसूचित जाती उपाययोजन या वैयक्तिक लाभाच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत लाभधारकांचे अर्ज मागविण्यास मान्यता देण्यात आली.
सभेस समिती सदस्य संध्याताई आठरे, सोनालीताई रोहमारे, शांताबाई खैरे, दिनेश बर्डे, वंदनाताई लोंखडे, रावसाहेब कांगुणे, सुनिताताई दौंड, सचिव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबारे आदि उपस्थित होते.
पंचायत समिती स्तरावर लाभधारकांचे अर्ज स्वीकारणे दि.१ ते ३१ जुलै २०२०, 
अर्ज छाननी दि.१ ते ७ आँगस्ट, पात्र लाभधारकांची यादी जिल्हास्तरावर दि.१० ते १२ आँगस्ट, सोडत पध्दतीने लाभधारकांचे निवड दि.१३ ते १४ आँगस्ट
सर्वसाधारण योजनेत वैराण विकास योजना ६६ लाख २१ हजार रु., आदिवासी उपाययोजनेत २०१९-२० मध्ये तलंगा गट वाटपसाठी ४० लाख, शेळी गट वाटपसाठी ४७ लाख. 
२०२०-२१ साठी वैराण विकास योजनेसाठी ४ लाख २० हजार रु., तलंगा गट वाटपसाठी २० लाख रु., 
अनुसूचित जाती उपाययोजना - शेळी गट वाटपासाठी ३७ लाख ८८ हजार रु.
पावसाळ्यापूर्वीचे रोग प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. यात जिल्ह्यात दि.२० जून अखेर घटसर्प (१ लाख २७ हजार ३० रु), फऱ्या (१ लाख ११ हजार ६७७ रु), घटसर्प फऱ्या (३ लाख ४ हजार २५४ रु), आंत्रविषार (१ लाख ४४ हजार ६६० रु), पीपीआर (१९ हजार ८४५ रु), राणीखेत ( ३ लाख ७७ हजार ७५ रु), कोंबड्याची देवी ( ३ लाख ४४ हजार ४८६ रु) आणि इतर साठी (१९ हजार ७०० रु) असे एकूण रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी १४ लाख ४८ हजार ८१२ रु. खर्च झाला आहे.

Post a Comment

0 Comments