Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर गुटखातस्कर पोलिसाला बेड्या ; तीन दिवसाची कोठडी


गुटखा बाळगून वाहतूक केल्याचा आरोप 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१७ - पारनेर तालुक्यातील निघोज येथील गुटखा तस्करीतील भागीदार पोलिस शिवाजी कावडे याला आज गुटखा बाळगुन वाहतुक केल्याप्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशी माहीती समजली आहे. निघोज येथे अवैध व्यावसायिकांसह, गुन्हेगारांशी सलगी ठेवल्याप्रकरणी त्याची नुकतीच नगर मुख्यालयात ऊचलबांगडी करण्यात आली होती. परंतु निघोज , पारनेर शिवाय त्याचे मन नगरला रमत नव्हते. तो वारंवार निघोजला येत होता. निघोज येथे एका मोठ्या गुटखा व्यापाऱ्या सोबत त्याची भागीदारी होती.आजपर्यंत त्याने पोलिस खात्याचा वापर करून गुटखा व्यापारात चांगला जम बसवला होता. याबाबतची तक्रार वर्षभरापुर्वी लोकजागृती सामाजिक संस्थेने पोलिस अधिक्षकांकडे केली होती. परंतु त्या चौकशीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. नंतर दि १४ जुन रोजी हा पोलिस त्याच्या साथीदारासह मुंबई येथुन गुटखा घेवून पारनेरकडे येत असताना त्यांना खोपोली पोलिसांनी पकडले होते.
परंतु ते पोलिस खात्यात असल्याचा फायदा घेवून तेथून बदली आरोपी ( जयेश जर्नाधन जाधव रा. खानापुर) देवून आपली सुटका करून घेतली.
या बाबत माहिती मिळताच लोकजागृती सामाजिक संस्थेने रायगड पोलिस अधिक्षकांकडे या विषयी तक्रार केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यावरून शिवाजी कावडेला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिवाजी कावडे याच्या बरोबर इतर भागीदारांचीही या प्रकरणी चौकशी करण्यात येऊ शकते. कावडे हा गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. त्यातुन त्याने कोट्यावधी रूपयांची मालमत्ता जमवल्याची माहिती आहे. पारनेर पोलिस ठाण्याच्या सुशोभीकरण प्रकरणात त्याने मोठा निधी जमवून काही दडवून ठेवला आहे.
त्याबाबत लाचलुचपत खात्याकडेही तक्रार करण्यात आली होती.
शिवाजी कावडे या पोलिसाच्या कृत्यामुळे पोलिस खात्याची चांगलीच बदनामी झाली आहे. त्यामुळे अ. नगर पोलिस अधिक्षक त्याच्यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments