Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तीन दिवसांत नालेसफाई करा अन्यथा आयुक्तच्या दालनात गाळ टाकणार ; माजी नगरसेवक अजिक्य बोरकर यांचा इशारा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२६ - गुलमोहर रोडवर, नरहरी नगर सह गुलमोहर रोडवरील नाल्याची सफाई येत्या तीन दिवसांत न केल्या महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात नाल्यातील गाळ टाकत आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक अजिक्या बोरकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
कोहिनूर मंगल कार्यालय परिसर, नरहरी नगर, मधूबन कॉलनीसह गुलमोहोर रोड परिसरातील समस्यांची पाहणी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केली. यावेळी नगरसेविका शोभा बोरकर, मनसुख वाबळे, माजी नगरसेवक अजिक्या बोरकर, कुमार नवले, सिटी इंजिनिअर डॉ.अरविद अनचवले, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे,  अभंग  यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक बोरकर म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात या भागात नाले मोठया प्रमाणात तुबतात. त्यामुळे अनेकांच्या घरात नाल्याचे पाणी जाते. पावसाळ्या पूर्वी या सर्व परिस्थितीची माहिती महापालिका प्रशासनाला दिली गेली होते. आरोग्यअधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता ते फोन देखील घेत नाही. अनेक नाल्यातून गाळ काढला मात्र तो पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्याला सामोरे जावे लागते. तसेच हा भाग 100 टक्के महापालिकेचा कर भरणार आहे. त्यामुळे कर भरून देखील महापालिका स्थानिक नागरीकांना सोयी पुरविण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे येत्या 3 दिवसांत या परिसरातील सर्व नाल्याची सफाई न केल्यास थेट आयुक्तच्या दालनात गाळ टाकत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान आयुक्त मायकलवार यांनी तातडीने गुलमोहोर रोड, मधूबन कॉलनी, नरहरी नगर भागातील समस्याची पाहणी करत प्रशासनल तातडीने या समस्या मार्गी लवण्याचे आदेश दिले.

Post a Comment

0 Comments